दुर्गा महा रॅलीने कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेचा महिला दिन साजरा!
कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर प्रशालेमध्ये प्रत्येक उपक्रम हा कोणत्या ना कोणत्या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाने प्रसिद्ध होत असतो. त्याच प्रमाणे ०८ मार्च या जागतिक महिला दिनानिमित्य प्रशालेच्या प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई यांच्या संकल्पनेतून दुर्गा महा रॅली या सदराखाली प्रशालेतील सर्व महिला शिक्षिका व माता पालक यांची दुचाकीवरून दुर्गा महारॅली संपन्न झाली.
पंढरपूर येथील कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशाले मध्ये महिला दिनाचे औचित्य साधून पालक महिलांची बाईक रॅली काढण्यात आली. या महिला दिनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून इ.१ली, ५वी व ७वी च्या विद्यार्थिनींनी सुंदर अशा प्रकारे मराठी गाण्यावर बहारदार नृत्य सादर केले. तसेच महिला शिक्षिकांना महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी इ.९वी च्या विद्यार्थिनींनी प्रशालेमध्ये अध्यापनाचे कार्य पार पाडले. प्रशालेमध्ये पुनरागमन झाल्यानंतर प्रशालेतील शिक्षकांनी या सर्व महिला शिक्षकांसाठी ‘एक आनंदी कार्यक्रम’ सादर केला. यामध्ये महिलांसाठी विविध खेळ, कविता व अल्पोपहार देऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, यांच्या नावाचा जयजयकार करून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
सदर कार्यक्रमामध्ये कर्मयोगी विद्यानिकेत मधील चौथीच्या तसेच इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी सर्व महिला पालकांसाठी उत्कृष्ट प्रकारे नृत्य सादर करून आपल्या आईला अभिवादन केले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या प्रियदर्शिनी: सरदेसाई ह्या होत्या. प्रसंगी त्या म्हणाल्या की, आज जगातील कुठल्याही क्षेत्रामध्ये महिला ह्या पुरुषांसोबत नाही तर पुरुषांपेक्षाही सरस अशी कामगिरी करत आहेत. त्यांनी इतिहासातील काही महिलांचे उदाहरण देताना महिलांच्या शौर्यगाथा त्यानंतर भारतातील शास्त्रज्ञ सुनीता विल्यम्स ,कल्पना चावला याचबरोबर जगातल्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांची माहिती त्यांनी करून दिली. ८ मार्च हा दिवस महिला दिवस म्हणून का साजरा केला जातो? याची संक्षिप्त अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी महिला दिवसाचे औचित्य साधून इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम केले.यानंतर सुमारे २०० महिला पालक व शाळेतील महिला शिक्षिका पंढरपूर मध्ये बाईक रॅली मध्ये सामील झाल्या. ही रॅली एवढी प्रचंड आणि भव्य होती की सर्वांनी या रॅलीचे कौतुक तर केलेच परंतु महिला पालकांबरोबर व प्राचार्यां सोबत सेल्फी काढण्याचा बऱ्याच लोकांना मोह आवरता आला नाही. या रॅलीसाठी संस्थेचे विश्वस्त माननीय रोहनजी परिचारक व रजिस्ट्रार गणेशजी वाळके यांनी शुभेच्छा देत, रॅलीला सुरुवात करताना सर्व महिला पालकांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
पंढरपूर (प्रतिनिधी)समाज माध्यमांचे जसे फायदे आहेत तसेच माध्यमांमुळे चुकीची माहिती पसरवण्याची शक्यता जास्त असून अनेकदा…
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये दिनांक 8 मार्च 2025 रोजी जागतिक…
अॅड. संदिप कागदे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून अटकपूर्व जमीन मंजूर लोखंडी पहारीने जखमी करून…
पंढरपूर (दि.04) :- इयत्ता दहावीच्या उर्वरित पेपर साठीची परिक्षा अत्यंक कडक आणि शिस्तबध्द घेण्यात याव्यात. तालुक्यात बोर्डाच्या…
येथील कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर प्रशालेमध्ये विज्ञानदिनानिमित्त प्रशालेच्या नर्सरी ते ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन…
पंढरपूर/प्रतिनीधी पुणे येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीसाठी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे पाणीदार आमदार समाधान…