ताज्याघडामोडी

दहावीची परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडावी प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या सूचना

   पंढरपूर (दि.04) :- इयत्ता दहावीच्या उर्वरित पेपर साठीची परिक्षा अत्यंक कडक आणि शिस्तबध्द घेण्यात याव्यात. तालुक्यात बोर्डाच्या परीक्षेसाठी निश्चित करण्यात आलेल्या केंद्रावर गैरप्रकार होणार नाही दक्षता घेवून दहावीची  परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडावी तसेच परिक्षेसाठी कॉपी करणारा आणि कॉपी करण्यासाठी मदत करणाऱ्या शैक्षणिक संस्था आणि पालकांवर देखील कारवाई करण्यात येईल अशा सूचना प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या.

       तालुक्यात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी  शेतकी भवन, पंचायत समिती पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, गटविकास अधिकारी सुशिल संसारे, गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे, नायब तहसिलदार वैभव बुचके यांच्यासह  परिक्षा केंद्राचे केंद्रप्रमुख उपस्थित होते.

        यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे म्हणाले, सध्या दहावी व बारावीची बोर्ड परीक्षा सुरू आहे. उर्वरित पेपरसाठी कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेवून  आवश्यक उपाययोजना कराव्यात.  कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणाऱ्यांवर कडक व वेळप्रसंगी फौजदारी  कारवाई करण्यात येणार आहे.परिक्षा या कॉपीमुक्त होण्यासाठी भरारी पथक कार्यरत असून त्याव्दारे परिक्षा केंद्रावर निगराणी करण्यात येत आहे. प्रशासनाच्या कॉपीमुक्त अभियानात विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी सहभागी होवून हे अभियान यशस्वी करण्यास सहकार्य करण्याचे आवाहनही प्रांताधिकारी श्री. इथापे केले आहे.

             परीक्षेदरम्यान गोंधळ होऊ नये तसेच परिक्षा केंद्रावर सुरक्षा व्यवस्था चोख राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाकडून आवश्यक बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांनी यांनी सांगितले

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago