ताज्याघडामोडी

वैज्ञानिक बुद्धिमत्तेच्या सहायाने कर्मयोगी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी भरवले भव्य विज्ञान प्रदर्शन!!!!

येथील कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर प्रशालेमध्ये विज्ञानदिनानिमित्त प्रशालेच्या नर्सरी ते ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासून भव्य विज्ञान प्रदर्शन संपन्न केले. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन सोलापूर जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्री लक्ष्मीप्रसाद मोहिते सरांनी केले. या प्रदर्शनामध्ये नर्सरी, जुनियर केजी व सीनियर केजी च्या विद्यार्थ्यांनी औषधी वनस्पती हा विषय घेऊन प्रदर्शनात विविध वनस्पतींची माहिती सादर केली. तसेच इ.१ली ते ९ वी च्या विद्यार्थ्यांनी अनेक वैज्ञानिक उपक्रम सादर केले. यामध्ये पारंपरिक ऊर्जा, सौर ऊर्जा, जलस्त्रोत, सौरमंडळ, चंद्रयान ३,मंगल रोवर तसेच पारंपरिक शेती, नैसर्गिक शेती,  आधुनिक शेती, सामूहिक शेती आधुनिक शहर निर्मिती, गोबर गॅस, कचऱ्यांची विल्हेवाट, संगणक कोडींग माध्यमातून नवीन तंत्रज्ञान वापरून अपघात रोधक कारची निर्मिती, अशा अनेक वस्तूंचे सादरीकरण करून प्रमुख पाहुणे तसेच सर्व पालकांची मने जिंकली. या भव्य प्रदर्शनाची संकल्पना व प्रेरणा प्रशालेच्या प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई यांची होती. जवळपास एक महिना हे विद्यार्थी या प्रदर्शनासाठी स्वतः उपक्रम तयार करत होते. या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेतील विज्ञान शिक्षक श्री सुधीर गोडसे सर, अन्सार पटेल सर व अनिता बडवे आणि मोनिका अटकले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या प्रदर्शनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे उद्घाटना वेळी  इ. ५वी च्या विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित लावणी सादर केली. या विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रशालेच्या प्रांगणात विज्ञानातील विविध घटकांची रांगोळी साकारण्याचे काम महिला शिक्षकांनी केले. विज्ञानाला सर्व विषयांची जोड असते याचे उदाहरण म्हणजे चित्रकला व हस्तकला शिक्षिकांनी सेल्फी पॉईंट तयार करून जे सेल्फी फोटो घेणार आहेत यांना अंतराळ सफर घडवण्याचा प्रयत्न केला.

 या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी  पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त श्री. प्रणवजी परिचारक, संस्थेचे रजिस्ट्रार श्री वाळके सर, डॉ.सोनवणे, डॉ. श्रीराज काणे हे उपस्थित होते. या सर्वांनी या विज्ञान प्रदर्शनाचे भरभरून कौतुक केले. हे प्रदर्शन पालक व विद्यार्थ्यांसाठी दोन दिवस खुले ठेवण्यात आले होते. हे विज्ञान प्रदर्शन भव्य प्रमाणात सादर करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले या विज्ञान प्रदर्शनासाठी संस्थेचे प्रमुख विश्वस्त श्री रोहनजी परिचारक यांनीदेखील शुभेच्छा दिल्या.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

5 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago