ताज्याघडामोडी

जी बी एस साथ रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासन सज्ज : आ.समाधान आवताडे आ. आवताडे यांनी घेतली पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील प्रशासनाची बैठक

पंढरपूर
Gbs साथ रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील प्रशासन सज्ज आहे, पंढरपूर नगरपालिका प्रशासन आणि ग्रामीण भागात आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, आशा वर्कर्स ताईंच्या मार्फत सर्व्हे सुरू आहे, पाणी तपासणी, अन्न पदार्थ तपासणे, मोहीम हाती घेतली जाईल, दूषित पाण्याची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आ. समाधान आवताडे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. पंढरपूर शहरात नुकतेच जी बी एस चे दोन रुग्ण आढळले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी आ. आवताडे यांनी प्रशासनाची बैठक पंढरपूर शासकीय विश्राम गृह येथे घेतली. या बैठकीस प्रांताधिकारी बी.आर. माळी,तहसीलदार सचिन लगोटे,मदन जाधव, पंढरपूर सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीकारी डॉ. महेश सुडके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, शहर पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, नगरपालिका उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, यांच्यासह विविध शासकीय विभागाचे अधिकारी, पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक उपस्थित होते. प्रारंभी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीकारी महेश सुडके यांनी जीबीएस साथीच्या बाबतीत माहिती दिली. त्याच बरोबर तालुका वैद्यकीय अधिकारी, पंढरपूर नगरपालिका उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांनी शहरातील नियोजनाची माहिती दिली. यावेळी पुढे बोलताना आ. आवतडे म्हणाले की, पंढरपूर शहरात दोन जीबीएसचे दोन रुग्ण सापडले आहेत. नुकतीच माघी यात्रा संपन्न झाली, तसेच शनिवार, रविवारी शहरात लाखावर भाविक येत असतात. पुणे, मुंबई येथील जीबीएस साथीचे रुग्ण वाढलेले आहेत. या पाश्वभूमीवर gbs चा प्रादुर्भाव वाढू नये साठी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुका प्रशासनाने दक्षता घ्यावी. हा रोग मुख्यतः पाणी आणि अन्नातून प्रसारित होतो, हे लक्षात घेता पिण्याच्या पाण्याच्या योजना भीमा नदीवर अवलंबून आहेत, या पाण्यावर योग्य त्या तपासण्या करण्यात याव्यात, पाणी शुद्धीकरण करण्याचे काम केले जावे, अशा सूचना केल्या.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

6 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

2 weeks ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago