ताज्याघडामोडी

पंढरपूर-मंगळवेढ्यासाठी उद्योग द्यावेत : आ. आवताडे

प्रतिनिधी

कुशल नेतृत्वाखाली दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने ऐतिहासिक गुंतवणूक प्राप्त केली आहे. दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फॉर्म 2025 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याने तब्बल 15.70 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यासाठी प्राप्त केली आहे ही ऐतिहासिक गुंतवणूक महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तुत्वाने देशातील इतर राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक जास्त गुंतवणूक प्राप्त केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करण्याचे पत्र पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाच्या वतीने देऊन काही उद्योग पंढरपूर व मंगळवेढा औद्योगिक वसाहतीमध्ये देण्यात यावेतं अशी मागणी करत मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक महाराष्ट्रासाठी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे .

त्यांनी दिलेले या पत्रात असे म्हटले आहे की माझ्या मतदारसंघात नुकतेच आपण पंढरपूर एमआयडीसी मंजूर करून दिली आहे सध्या त्या जागेची मोजणी चालू असून लवकरच ती जागा फिक्स होणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार असून आपण त्या ठिकाणी नवीन उद्योगासाठी कंपन्यांशी बोलून पंढरपूर साठी काही उद्योग पाठवले तर येथील तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर मंगळवेढा एमआयडीसी बाबत ही मी नुकतीच बैठक घेऊन येथे जागा घेऊन उद्योग सुरू करण्यात व्यवसायिकांना नोटीसा काढून तात्काळ उद्योग सुरू करा अन्यथा त्यांच्या जागा काढून घ्या अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असून मंगळवेढा येथील औद्योगिक वसाहतीमध्येही उद्योगधंद्यासाठी जागा उपलब्ध आहेत येथेही तात्काळ औद्योगीकरणाच्या दृष्टीने नवीन उद्योगांसाठी काही उद्योगपतींना आपल्या माध्यमातून प्रोत्साहित केले तर अनेक उद्योगधंदे येथे येऊ शकतात त्यामुळे नवीन गुंतवणूकदारांना आपण पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये भविष्यात आपल्या माध्यमातून मोठी परकीय गुंतवणूक करून मोठे उद्योग स्थापित करत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याल अशी अशा व्यक्त करतो अशा आशयाचे शुभेच्छा संदेश पत्र आमदार समाधान आवताडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून देऊन त्यांचे अभिनंदन केले

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 hour ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago