ताज्याघडामोडी

बर्ड फ्लू बाबत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी सोलापूर यांच्याकडून दक्षतेचे आवाहन प्रादुर्भाव टाळण्यासाठी रोजची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना

बर्ड फ्लू बाबत सतर्कतेचे आवाहन
सोलापूर दि.31 (जिमाका):- जिल्ह्यातील सर्व शासकीय खाजगी व परीसरातील कुक्कुट पालक तसेच पशुपालक , शेतकरी व सुजान नागरीकांना कळविण्यात येते की , आपल्या राज्यातील काही जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लू /एव्हिएन इन्फ्लूएन्झा (H5N1) या आजाराने कुक्कुट पक्षी व कावळ्यांमध्ये मरतुक झालेली आढळल्याने आपण ह्या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपल्या प्रक्षेत्रावरील रोजची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करून जैवसुरक्षा विषयक बाबींचे काटेकोर पणे पालन करणे आवश्यक आहे. तसेच संशयीत ठिकाणाहून पक्षांची वाहतुक टाळावी आणि ज्या ठिकाणी स्थलांतरीत पक्षी मोठ्याप्रमाणात आढळतात तेथील नागरीकांनी सतर्कता बाळगावी .
तसेच मानवी आहारामध्ये व्यवस्थित उकडलेली अंडी व शिजवलेले चिकन खाणे पूर्णपणे सुरक्षित आहे, याबाबत कोणीही अनावश्यक गैरसमज व अफवा पसरवू नयेत असे आवाहन पशुधन विकास अधिकारी, सधन कुक्कुट विकास गट, नेहरू नगर सोलापूर डॉ.स्नेहंका बोधनकर यांनी केले आहे. जिल्ह्यामध्ये अचानक मोठ्या प्रमाणावर पक्षांमध्ये मरतूक किंवा या आजाराचे लक्षणे आढळल्यास तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकिय दवाखान्याशी संपर्क साधावा . त्याचबरोबर सर्व क्षेत्रिय अधिकारी व कर्मचारी यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील कुक्कुट प्रक्षेत्राला नियमित भेट देऊन जैवसुरक्षा विषयक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करावे व आपल्या कार्यक्षेत्रातील रोग प्रादर्भावाबाबत दक्ष रहावे असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एन.एल. नरळे यांनी केले आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 hour ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago