ताज्याघडामोडी

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार समाधान आवताडे ॲक्शन मोडवर पालकमंत्री ना.जयकुमार गोरे यांचेसमोर भ्रष्ट अधिकाऱ्यांना फोडला घाम

प्रतिनिधी-जिल्हा नियोजन भवन, सोलापूर येथे राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीप्रसंगी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी उपस्थित राहून मतदारसंघातील तसेच समग्र जिल्ह्यातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने आपल्या मागण्या पालकमंत्री ना.गोरे यांच्यासमोर उपस्थित केल्या. सदर बैठकीमध्ये आपल्या मागण्या मांडत असताना आमदार आवताडे यांनी सांगितले की मागील नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आमदार आवताडे जिल्हा पातळीवरील पीक विमा संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता त्यावेळी संबंधित जिल्हा कृषी अधिकारी यांनी उत्तरादखल सांगितले होते की, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी समवेत बैठक घेतली असे सांगितले असता बैठक कधी संपन्न झाली ? सदर बैठकीसाठी कोणत्या लोकप्रतिनिधीला आमंत्रित केले होते ? असे सवाल आमदार आवताडे यांनी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचेसमवेत उपस्थित केले असता त्यावर अधिकाऱ्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला तदवेळी कृषी अधिकारी यांना पालकमंत्री ना. गोरे यांनी खडे बोल सुनावत कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच खात्याच्या अनुषंगाने बैठकीमध्ये जी चर्चा होते त्यावर योग्य तो तोडगा काढत कार्यवाही करणे बंधनकारक राहील असेही मंत्री महोदय यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील विविध शासकीय आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्र मध्ये नवनियुक्त डॉक्टर भरती करत असताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले यांनी गुणवत्तेचे अथवा वैद्यकीय डिग्रीचे सगळे नियम धाब्यावर बसून पैसे घेऊन या डॉक्टरांची भरती केल्याचे आमदार आवताडे यांनी निदर्शनास आणताच संबंधित आरोग्य अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश प्रस्तावित करण्याचे मंत्री महोदय यांनी यावेळी सांगितले. शिवाय या आरोग्य अधिकारी यांनी मंजूर आरोग्य केंद्रांची प्रशासकीय मान्यता देत असताना मोठ्या प्रमाणात आर्थिक कमिशन घेऊन त्या दिल्याचेही यावेळेस आमदार महोदय यांनी आ.सचिन कल्याणशेट्टी सोबतीने निदर्शनास आले आहे. या प्रकरणातील अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याचे ही पालकमंत्री ना. गोरे यांनी आदेशित केले आहे. राज्य व केंद्र सरकारची महत्वकांक्षी असणारी घरकुल योजनेचा गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना फायदा मिळण्यासाठी ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर आहे परंतु स्व-मालकीची जागा नाही त्यांना शासकीय धोरणाद्वारे जागा मिळण्यासाठी शासन ५० हजार अनुदान व बांधकामासाठी वाळू देण्याची तरतूद आहे. परंतु या संदर्भात व्यापक बैठक घेऊन सदर अनुदान वाढीव करून देण्याची आमदार आवताडे यांनी मागणी केली असता त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे पालकमंत्री ना. गोरे यांनी यावेळी सांगितले. निरनिराळ्या क्रीडा कौशल्य प्रकारांना गती मिळण्यासाठी आणि जिल्ह्यातील क्रीडा विश्वाला गतवैभव प्राप्त मिळवून शासन निर्गमित जे नवीन प्रस्ताव तयार केले जातात ते देण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार व इतर अधिकारी या संदर्भात पैशांची मागणी करून ते प्रस्ताव देतात असे निदर्शनास आल्यानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी पवार व इतर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री ना. गोरे यांनी यावेळी दिले आहेत. दुष्काळी तालुके अशी ओळख असणाऱ्या मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील पाणीप्रश्न अनुषंगाने म्हैसाळ योजनेतून आवर्तने सुरू करून मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील तलावभरून द्यावे तसेच पाणी वाटपात आमच्यावर होणारा अन्याय थांबून आम्हाला आमच्या हक्काचे पाणी येण्याची मागणी आमदार आवताडे यांनी यावेळी केली त्यावर या प्रश्नावर आपण पालकमंत्री या नात्याने राज्याचे जलसंपदा मंत्री यांच्याशी योग्य ती चर्चा करून अपेक्षित तोडगा काढू असे मंत्री ना.गोरे यांनी सांगितले.  संपूर्ण जिल्ह्यात क वर्गातील एकूण ५१२ देवस्थान असून त्यांना आतापर्यंत ७ कोटी अनुदान होते आता त्यामध्ये वाढ करुन ती मर्यादा १५ कोटी करण्यात आल्याने आपल्या तालुक्यातील महत्वपूर्ण आणि असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान लक्ष्मी दहिवडी येथील म्हस्कोबा, मरवडे येथील महालिंगराया तसेच शेटफळ (त) येथील बिरोबा देवस्थान यांना आमदार आवताडे यांच्या शिफारशीने क वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त होऊन त्यांचा तीर्थक्षेत्र निधी १५ कोटी मंजूर झाला आहे. शिवाय ३०५४ योजनेअंतर्गत जे रस्ते केले जातात त्यामध्ये तसेच शेतकऱ्यांना मिळणारे डीपी यामध्ये वाढ करुन मिळावी अशी मागणी आमदार आवताडे यांचेसमवेत इतर लोकप्रतिनिधी यांनी केली असता त्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले. मंगळवेढा तालुक्यातील भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या सौर ऊर्जा प्रकल्प मधील कामे गेल्या दोन वर्षांपासून अतिशय संथ गतीने सुरु असून त्या कामांची गती वाढवून लवकरात-लवकर कामे पूर्ण होण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी व आंधळगाव पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित करण्यासाठी कनेक्शन जोडणीचे काम त्वरित करण्याचे यावेळी आश्वस्त करण्यात आले. या बैठीकीसाठी आमदार सुभाष बापू देशमुख, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार दिलीप सोपल, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार उत्तम जानकर, आमदार नारायण पाटील, आमदार राजाभाऊ खरे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार अभिजित पाटील, आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, तसेच जिल्हा पातळीवरील सर्व प्रशासकीय अधिकारी तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

5 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago