ताज्याघडामोडी

सफाई कर्मचाऱ्यांच्या मेडिक्लेम बाबत ज्या बँकेची चांगली पॉलिसी असेल ती पॉलिसी लागू करावी -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

सोलापूर, दिनांक 2(जिमाका):- जिल्ह्याच्या नागरी व ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा एकही पाल्य केंद्र शासनाच्या शिष्यवृत्ती योजने पासून वंचित राहू नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांबाबतच्या जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार, समाज कल्याण च्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सोनवणे, सोलापूर महानगरपालिका उपायुक्त आशिष लोकरे, पोलीस उपअधीक्षक गृह विजया कुर्री, पंढरपूर नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत जाधव, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सचिन कावळे, सर्व नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, हाताने मैला उचलणाऱ्या कामगारांच्या पाल्यासाठी केंद्र शासनाने शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना सुरू केलेली आहे, त्यानुसार जिल्ह्याच्या नागरी व ग्रामीण भागातील आशा कामगारांचा एकही पाल्य शैक्षणिक शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाही यासाठी संबंधित गटशिक्षणाधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, महापालिकेचे शिक्षण अधिकारी यांनी संबंधित विद्यार्थ्याकडून परिपूर्ण अर्ज भरून घ्यावेत. प्रलंबित असलेल्या अर्जासाठी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक यांची बैठक घेऊन अर्ज परिपूर्ण करण्याबाबत सूचित करावे. तसेच शिष्यवृत्ती मंजूर असलेल्या व नव्याने शिष्यवृत्ती अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून घ्यावे. व ही सर्व कामे 15 जानेवारी 2025 पर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.
लाड पागे समितीच्या तरतुदीप्रमाणे जिल्ह्यात झालेल्या नवीन नगरपंचायतीमध्ये सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यासाठी राज्य शासनाकडून कर्मचारी आकृतीबंध मंजूर होणे आवश्यक आहे, आकृतीबंध मंजुरीची कार्यवाही करण्यात येत आहे. आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर नवीन नगरपंचायतीमध्ये सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्याबाबत संबंधित मुख्याधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत, असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले. त्याप्रमाणे अन्य नगरपंचायतीमध्ये रिक्त पद, शैक्षणिक अर्हता, बिंदू नामावलीप्रमाणे नियुक्ती देण्याबाबत निर्देशित करण्यात आलेले आहे.
सफाई कामगारांसाठी मेडिक्लेम बाबत ज्या बँकेची मेडिक्लेम पॉलिसी कामगारांच्या अधिक फायद्याची आहे अशा बँकांची मेडिक्लेम पॉलिसी घेण्याबाबत जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच सफाई कामगारांच्या किमान वेतनाबाबत सर्व खाजगी कॉन्ट्रॅक्टर यांनी कामगारांना धनादेशाद्वारे वेतन दिले पाहिजे, असे निर्देश आशीर्वाद यांनी दिले. तसेच सर्व मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्त काम करणाऱ्या सफाई कामगारांमधील महिला कामगारांना एकत्रित करून त्यांचे बचत गट निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. कामगारांची आरोग्य तपासणी नियमित करावी, त्यांना आवश्यक असलेले साहित्य वेळेत व दर्जेदार पुरवठा होईल याची खबरदारी घ्यावी असेही त्यांनी सूचित केले.
प्रारंभी जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका श्रीमती पवार यांनी हाताने मैला उचलणाऱ्या कामगारांसाठी नागरी भागात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. सफाई कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती योजना, रिक्त पदावरील नियुक्ती तात्काळ देणे, श्रम साफल्य योजना, सफाई कामगारांच्या निवासाची डागडुजी करणे, कामगारांसाठी असलेल्या सुविधा, ऋतू नुसार साहित्य उपलब्धता, आरोग्य तपासणी, मेडिक्लेम, किमान वेतन, आश्वासित प्रगती योजना, कामगारांना सुट्ट्या देणे, रोजंदारी कामगार बाबतची सविस्तर माहिती चे सादरीकरण श्रीमती पवार यांनी केले.
जिल्हाधिकारी यांच्याकडून सोलापूर विमानतळ येथील कामांचा आढावा-
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर विमानतळ सुरू करण्याच्या अनुषंगाने विमानतळ प्राधिकरण यांच्याशी विविध विषयावर चर्चा करून कामांचा सविस्तर आढावा घेतला. विमानतळावर अग्निशामन वाहन सोलापूर महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली तसेच विमानतळ परिसरात विविध पक्षी यांचे सर्वेक्षण करण्याबाबत वनविभाग महापालिका यांना सूचना देण्यात आल्या. सोलापूर विमानतळावर प्रवासी विमान वहतूक सुरू झाल्यानंतर विमान ये – जा करण्याच्या वेळेस ओला, उबेर यांची टॅक्सी सेवा सुरू व्हावी, याबाबत माहिती घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी यावेळी दिल्या.
यावेळी यावेळी उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, प्रांताधिकारी सदाशिव पडदूने, सुमित शिंदे, तहसीलदार निलेश पाटील, किरण जमदाडे, वन विभाग, हवामान विभाग, विमानतळ प्राधिकरण व अग्निशमन दलचे अधिकारी उपस्थित होते.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सोलापूर जिल्ह्यात महिला समृद्धी योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ जिल्हा व्यवस्थापक यांचे आवाहन

सोलापूर दि.1 जानेवारी 2025 (जिमाका) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मार्फत मांग, मातंग,…

5 days ago

पंढरपूरसाठी आमदार अभिजित पाटील यांची मोठी मागणी ‘केंद्रीय कृषी उडान योजना २.०’ अंतर्गत पंढरपुर परिसरात विमानतळ करावे

पंढरपुर येथे 'केंद्रीय कृषी उडान योजना २.०' अंतर्गत विमानतळ व्हावे या मागणीसाठी आमदार अभिजित पाटील…

1 week ago

हॉस्टेलमधून पळाली, 4 जिल्हे भटकली, विद्यार्थिनीवर 4 ठिकाणी 4 जणांकडून अत्याचार, महाराष्ट्राला हादरवणारी घटना!

महाराष्ट्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडिलांसोबत वाद झाल्यानंतर हॉस्टेलमधून पळून गेलेल्या एका…

2 weeks ago

सर्व शासकीय विभागांनी आपले सरकार पोर्टल वरील तक्रारींचा वेळेत निपटारा करावा -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद *जिल्ह्यात 19 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत सुशासन सप्ताह

*ॲड जगदीश धायतिडक यांचे दिवाणी व महसुली कायद्याच्या अनुषंगाने विषयक सविस्तर मार्गदर्शन *सुशासन सप्ताह निमित्त…

2 weeks ago

आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नाने मतदार संघातील रस्ते होणार चकाचक आ.अभिजीत पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेत रस्त्यांसाठी निधीची मागणी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदारसंघातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी केली मागणी…

2 weeks ago

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; 69 लाख 45 हजाराची रंगमिश्रीत सुपारी जप्त

सोलापूर, दिनांक 20 (जिमाका)- सोलापूर येथील विजापुर रोड, नांदणी टोल नाका, ता.दक्षिण सोलापूर येथे टाटा…

2 weeks ago