ताज्याघडामोडी

हॉस्टेलमधून पळाली, 4 जिल्हे भटकली, विद्यार्थिनीवर 4 ठिकाणी 4 जणांकडून अत्याचार, महाराष्ट्राला हादरवणारी घटना!

महाराष्ट्राला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडिलांसोबत वाद झाल्यानंतर हॉस्टेलमधून पळून गेलेल्या एका १७ वर्षीय मुलीवर चार जणांनी लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपींनी पीडित मुलीला मदत करण्याच्या बहाण्याने अत्याचार केला आहे. मुलगी हॉस्टेलमधून गायब झाल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी वेदांतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला असता ती पुण्यात असल्याचं पोलिसांना समजलं. त्यानुसार पोलिसांनी पीडितेचा माग काढला, तिला जेव्हा पोलिसांनी ताब्यात घेतलं, तेव्हा तिने जे सांगितलं, ते ऐकून पोलिसांना देखील धक्का बसला आहे. ७ वर्षीय मुलगी नीट परीक्षेची तयारी करत आहे. ती छत्रपती संभाजीनगरमध्ये एका हॉस्टेलमध्ये राहत होती. अभ्यासाच्या तणावातून ३० नोव्हेंबरला तिचा आई-वडिलांशी वाद झाला. या वादानंतर रागाच्या भरात मुलगी हॉस्टेलमधून निघून गेली. त्यावेळी तिच्याकडे अवघे २०० रुपये होते. त्यामुळे ती एसटी, रेल्वे आणि मिळेल त्या वाहनाने प्रवास करायला सुरुवात केली. ती नाशिक यवतमाळ, परभणी आणि पुणे अशा चार जिल्ह्यात फिरली. पण या चारही जिल्ह्यात वेगवेगळ्या तरुणांनी तिच्यावर मदत करण्याच्या बहाण्याने अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी समाधान शिंदे (रा. पुणे), निखिल बोर्डे (नाशिक), प्रदीप शिंदे (परभणी) आणि रोहित ढाकरे (पुसद) अशा चार जणांना अटक केली आहे. हॉस्टेलमधून बाहेर पडल्यानंतर पीडित विद्यार्थिनी सर्वप्रथम परभणीला गेली होती. याठिकाणी रेल्वे स्थानकावर तिला प्रदीप शिंदे भेटला. त्याने राहण्यासाठी जागा देण्याच्या नावाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर आरोपीनं तिला पुसदला सोडले. पुसदला ओळखीच्या असलेल्या रोहित ढाकरे याने तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. यानंतर ती नाशिकला गेली. इथे पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या निखील बोर्डे याने जेवण, राहण्यासाठी पैसे देण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार केला. तीन जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या तरुणांनी तिच्यावर अत्याचार केल्यानंतर पीडित मुलगी पुण्याला आली. इथे तिची भेट समाधान शिंदे या टॅक्सीचालकासोबत झाली. त्यानेही मदत करण्याच्या बहाण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पोलिसांनी पीडित मुलीचा तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेतला, तेव्हा ती पुण्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तीन पोलीस पथकांच्या माध्यमातून पोलिसांनी तिचा शोध घेतला. तिला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तिच्याकडे विचारपूस केली असता, तिने तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या पोक्सो कलमांसह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास वेदांतनगर पोलीस करत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

3 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago