ताज्याघडामोडी

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; 69 लाख 45 हजाराची रंगमिश्रीत सुपारी जप्त

सोलापूर, दिनांक 20 (जिमाका)- सोलापूर येथील विजापुर रोड, नांदणी टोल नाका, ता.दक्षिण सोलापूर येथे टाटा कंपनीचे 12 टायर वाहन क्र-आर.जे-11- जीसी-9118 या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 24 हजार 498 किलो वजनाची रंगमिश्रीत व निकृष्ट दर्जाची सुपारी आढळून आली. सदर मालाची किंमत सुमारे 69 लाख 45 हजार 183 रुपये इतकी असून, हा साठा जप्त करण्ययात आला असल्याची माहिती रुपये सहायक आयुक्त (अन्न) साहेबराव देसाई यांनी दिली.
सहायक आयुक्त (अन्न) सा.ए.देसाई यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून, अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती अस्मिता टोणपे यांनी किटकबाधीत व रंग मिश्रीत सुपारी अन्न पदार्थाचा नमुना विश्लेषणासाठी घेऊन, उर्वरित 24 हजार 498 किलो, किंमत 69 लाख 45 हजार 183 रुपयेचा साठा कमी दर्जाच्या संशयावरून जप्त करून ताब्यात घेतला आहे. सदर प्रकरणी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत पुढील कारवाई सुरू आहे.
सदरची कारवाई सहायक आयुक्त साहेबराव देसाई, अन्न सुरक्षा अधिकारी व श्रीमती अस्मिता टोणपे तसेच नमुना सहायक श्रीशैल हिटनळ्ळी यांच्या पथकाने केली असल्याचे अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त (अन्न) श्री.देसाई यांनी कळविले आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

5 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago