ताज्याघडामोडी

जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी 15 कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी -निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार

*नियोजन भवन येथील सभागृहात 18 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता अल्पसंख्याक हक्क दिन साजरा होणार
सोलापूर, दिनांक 16 ( जिमाका):-अल्पसंख्याकाच्या कल्याणासाठी मा. पंतप्रधानांचा नवीन 15 कलमी कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी व पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी काटेकोरपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा अल्पसंख्याक संनियंत्रण समितीच्या बैठकीत श्रीमती कुंभार बोलत होत्या. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी रमेश काटकर, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार यांच्यासह अन्य संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती कुंभार पुढे म्हणाल्या की, अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी पंतप्रधानाचा नवीन 15 कलमी कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. माहे ऑक्टोबर 2009 मधील सुधारणाप्रमाणे या कार्यक्रमाची जिल्ह्यात अंमलबजावणी होत असून शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग, नियोजन विभाग, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पोलीस विभाग या सर्व विभागानी अल्पसंख्याक समाजातील पात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांना सुलभरीत्या लाभ मिळण्याचे नियोजन करावे, असेही त्यांनी सुचित केले.
प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी श्री. पवार यांनी मुस्लिम, ख्रिश्चन, शिख, बौद्ध, पारसी व जैन या अल्पसंख्याक समुदायातील लाभार्थ्यांना 15 कलमी कार्यक्रमांतर्गत देण्यात येत असलेल्या लाभाची माहिती दिली. तसेच 18 डिसेंबर रोजी अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यात येतो त्यानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियोजन भवन येथील सभागृहात अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त कार्यक्रम ठेवण्यात आलेला असून जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असेही त्यांनी आवाहन केले.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत सन 2025 मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

सोलापूर दि.17 (जिमाका):- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एम.पी.एस.सी) सन 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे…

1 day ago

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या प्रशिक्षण योजनेसाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर दिनांक 24 (जिमाका):- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग,…

5 days ago

आमदार अभिजीत पाटील यांच्या पुढाकाराने मतदार संघातील रेल्वेचे सर्व प्रश्न सुटणार आमदार पाटील यांची रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर महत्त्वपूर्ण बैठक

(अधिकाऱ्यांसोबत केला रेल्वेचा प्रवास आणि सांगितल्या महत्वपूर्ण त्रुटी) (मोडनिंब कार्गो टर्मिनल, रेल्वे उड्डाणपूल,माढा रेल्वे सुशोभीकरण,…

5 days ago

सोलापूरमध्ये एम्स रुग्णालय उभा करा, राज्य सरकार मदत करेल; खासदार प्रणिती शिंदे यांचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र

सोलापूर : खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरच्या विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.…

6 days ago