ताज्याघडामोडी

पंढरपूर अर्बन बँकेच्या व्यवहारावर कोणताही परिणाम नाही- मुळे शाखा बारामती येथील प्रकार… अपहार, चोरीबाबत बँकेकडे विमा पॉलिसी कार्यरत

शाखा बारामती येथील प्रकार…
अपहार, चोरीबाबत बँकेकडे विमा पॉलिसी कार्यरत

पंढरपूर दि. 10- पंढरपूर अर्बन बँकेच्या बारामती शाखेमधील व्यवस्थापकाने केलेल्या नऊ कोटी अपहाराचा कोणताही परिणाम बँकेच्या व्यवहारावर होणार नसून खातेदारांची सर्व रक्कम सुरक्षित आहे. याबाबत बँकेची सर्व रक्कम वसुलीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती बँकेचे चेअरमन सतीश मुळे यांनी दिली.

पंढरपूर बँकेच्या बारामती शाखेचा व्यवस्थापक अमित प्रदीप देशपांडे याने आपल्या पदाचा गैरवापर करत नऊ कोटी तीन लाख रुपयाचा अंतर्गत बँकिंग फसवणूकीचा आर्थिक गैरव्यवहार केला आहे. याप्रकरणी बँकेने बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून देशपांडे याने गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे. बँकेच्या अंतर्गत तपासणीमध्ये एक महिन्यापूर्वी सदर आर्थिक अपहार केल्याची माहिती समोर आली. यानंतर तातडीने बँकेच्या अधिकाऱ्यांनी देशपांडे याची व त्याच्या कुटुंबातील सदस्यांची सर्व खाती गोठवली आहेत. हा प्रकार फक्त बारामती शाखेपुरता मर्यादित असून कोणत्याही ग्राहकांच्या खात्याशी संबधित नाही. यामुळे बँकेच्या कोणत्याही खातेदाराचे नुकसान झाले नाही.

शाखास्तरावर बनावट नावाची खाते काढून व्यवस्थापक देशपांडे याने हा प्रकार केला आहे. यामध्ये कोणत्याही ग्राहकांचे नुकसान झाले नसलेचे मागील १५-२० दिवसांचे तपासणी दरम्यान निश्चित झाले आहे. बँकेची अशा बाबीसाठी स्वतंत्र विमा पॉलिसी कार्यरत आहे. यामुळे बँकेच्या व्यवहारावर याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे बँकेच्या व्हाईस चेअरमन माधुरी जोशी यांनी सांगितले.

दरम्यान राज्यात पंढरपूर अर्बन बँकेच्या 30 शाखा असून 2500 कोटी-हुन अधिक व्यवसाय आहे. झालेल्या अपहारामुळे सभासदांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नसून बँकेची आर्थिक परिस्थिती मजबूत आहे. याबाबत आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असल्याचे बँकेचे सीईओ उमेश विरधे यांनी स्पष्ट केले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत सन 2025 मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

सोलापूर दि.17 (जिमाका):- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एम.पी.एस.सी) सन 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे…

2 days ago

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या प्रशिक्षण योजनेसाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर दिनांक 24 (जिमाका):- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग,…

6 days ago

आमदार अभिजीत पाटील यांच्या पुढाकाराने मतदार संघातील रेल्वेचे सर्व प्रश्न सुटणार आमदार पाटील यांची रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर महत्त्वपूर्ण बैठक

(अधिकाऱ्यांसोबत केला रेल्वेचा प्रवास आणि सांगितल्या महत्वपूर्ण त्रुटी) (मोडनिंब कार्गो टर्मिनल, रेल्वे उड्डाणपूल,माढा रेल्वे सुशोभीकरण,…

6 days ago

सोलापूरमध्ये एम्स रुग्णालय उभा करा, राज्य सरकार मदत करेल; खासदार प्रणिती शिंदे यांचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र

सोलापूर : खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरच्या विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.…

6 days ago