डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नोलॉजीकल यूनिवर्सिटी लोणेरे अंतर्गत आंतर महाविद्यालयीन रायफल व पिस्टल शूटिंग या विभागीय क्रीडास्पर्धे मध्ये श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालय शेळवे पंढरपूर येथील विद्यार्थ्यानी घवघवीत यश संपादित केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नोलॉजीकल यूनिवर्सिटी लोणेरे व कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये रायफल शूटिंग विभागस्तरावरील स्पर्धे मध्ये कर्मयोगी च्या वैष्णवी खटावकर व आदित्य सदेवाले यांनी पिस्टल शूटिंग मध्ये प्रथम क्रमांक तर रायफल शूटिंग मध्ये प्रतीक्षा कोपनर यांनी द्वितीय तर वैष्णवी तांबवे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
सदर ची स्पर्धा ही आर्यमान शूटिंग क्लब पिलीव येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रातून सुमारे २४ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. वरील क्रीडा स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. गणेश बागल यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले. आर्यमान शूटिंग क्लब चे आकाश गुजरे यांनी पंच म्हणून काम पाहिले.
श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे विश्वस्त श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, विभागप्रमुख प्रा. डॉ. एस व्ही एकलारकर, प्रा. अनिल बाबर, प्रा. सोमनाथ लंबे, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख श्री गणेश बागल तसेच सर्व प्राध्यापक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सोलापूर दि.17 (जिमाका):- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एम.पी.एस.सी) सन 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे…
*नियोजन भवन येथील सभागृहात 18 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता अल्पसंख्याक हक्क दिन साजरा होणार…
माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिजित पाटील यांनी सोलापूरचे जिल्हाधीकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेत…
सोलापूर दिनांक 24 (जिमाका):- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग,…
(अधिकाऱ्यांसोबत केला रेल्वेचा प्रवास आणि सांगितल्या महत्वपूर्ण त्रुटी) (मोडनिंब कार्गो टर्मिनल, रेल्वे उड्डाणपूल,माढा रेल्वे सुशोभीकरण,…
सोलापूर : खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरच्या विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.…