ताज्याघडामोडी

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर या संस्थेच्या कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीला शासनाकडून कडून नुकतीच मान्यता मिळाली आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी बी फार्मसी व डी फार्मसी ला प्रवेश घेऊ शकतात. बी फार्मसी व डी फार्मसी ला प्रवेश घेण्यासाठी १६३४७ हा इन्स्टिटयूट कोड वापरावा लागणार आहे.
सध्या फार्मसी कंपन्यांमध्ये फार्मासिस्टला मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल बी फार्म, डी फार्म करण्याकडे दिवसेंदिवस वाढत आहे. याचाच विचार करून संस्थेने बी फार्म व डी फार्म हे दोन्ही कोर्स विद्यार्थ्यांसाठी चालू केले आहेत. यासाठी इन्स्टिट्यूट मध्ये सुसज्ज लॅब, तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग, अत्याधुनिक प्रशस्त क्लासरूम, वैद्यकीय सुविधा, सुसज्ज कम्प्युटर लॅब, अत्याधुनिक टेस्टिंग इन्स्ट्रुमेंट व मशीन्स उपलब्ध आहेत तसेच मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. या मान्यतेमुळे पंढरपूर शहर व तालुक्यातील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे विश्वस्त रोहन परिचारक यावेळी म्हणाले की कर्मयोगी संकुल मध्ये सध्या प्ले ग्रुप, ज्युनिअर केजी, सिनीयर केजी, प्रायमरी स्कूल, हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज डिप्लोमा व डिग्री अभियांत्रिकी कॉलेज, नर्सिंग कॉलेज इ कोर्सेस उपलब्ध आहेत. आता बी फार्मसी व डी फार्मसी या कोर्सेस ला मान्यता मिळाली आहे. तालुक्यातील विद्यार्थ्याला उच्च शिक्षणासाठी बाहेर जायला लागू नये म्हणून भविष्यामद्धे विद्यार्थ्यांसाठी मेडिकल कॉलेज काढण्याचाही मानस आहे असे ही त्यांनी संगितले.
यावेळी कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. गणेश वाळके यांनी बी व डी फार्मसीला प्रवेश घेऊन विद्यार्थ्यानी उपलब्ध करून दिलेल्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

5 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

2 weeks ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago