Categories: Uncategorized

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान
पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद पवार निष्ठ अशी ओळख असलेले राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे माजी शहर अध्यक्ष सुधीर भोसले यांच्यावर राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी जिल्हा संघटक पदाची जबाबदारी सोपविली आहे.सोलापूर पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत सुधीर भोसले यांना निवडीचे पत्र प्रदान कऱण्यात आले.   सोलापूर येथे आयोजित पक्षाच्या बैठकीस माजी महापौर महेश कोठे,सांगली व्यापार उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष सचिन चव्हाण,पंढरपूर तालुका अध्यक्ष संदीप मांडवे,अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष गुलाब मुलाणी यांच्यासह राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विविध पदाधीकारी उपस्थित होते.           
सुधीर भोसले यांनी २०१६ पासून राष्ट्रवादी कॉग्रेसचे पंढरपूर शहर अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली असून पक्षाचा झेंडा निष्ठेने हाती घेत त्यांनी शहरात पक्ष बळकट करण्याबरोबरच या शहरातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यपूर्व पाठपुरावा केल्याचे दिसून आले आहे. तर पक्षाच्या ध्येयधोरणे आणि विचारधारेचा प्रचार प्रसार करण्यासाठी ठोस भूमिका बजावली आहे.अनेक आंदोलनाचे नेतृत्व केल्याचे दिसून आले आहे.   
या निवडीनंतर बोलताना नूतन जिल्हा संघटक सुधीर भोसले म्हणाले कि,देशाचे नेते शरदचंद्र पवार व प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या विचारांचा वसा,पक्षाची तत्वे व ध्येयधोरणे तळागाळात पोहोचवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू.तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिह मोहिते पाटील,खासदार धैर्यशील मोहिते पाटील,उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष नागेश फाटे यांच्यासह पक्षाच्या जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा मार्गदर्शनाखाली जिल्हा संघटक म्हणून महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी करण्यासाठी परिश्रम घेऊ अशी ग्वाही दिली.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

23 minutes ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago