ताज्याघडामोडी

प्रथम वर्ष बी.फार्मसी आणि एम.फार्मसी प्रवेशासाठी कॅप राऊंड-१ चे ऑप्शन्स भरण्याची प्रक्रिया सुरु दि. ७ ऑक्टोबर पर्यंत चालणार ही प्रक्रिया

पंढरपूरः ‘शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी प्रथम वर्ष बी.फार्मसी आणि एम.फार्मसी प्रवेशाची पहिली फेरी (फर्स्ट कॅप राऊंड)चे ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया  शनिवार, दि. ५ ऑक्टोबर, २०२४ पासून ते सोमवार, दि. ७ ऑक्टोबर, २०२४ पर्यंत म्हणजेच  एकूण तीन दिवस चालणार आहे. या कालावधीत स्वेरी फार्मसीच्या  स्क्रूटिनी सेंटर (एस.सी क्रमांक ६३९७) मध्ये ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरण्याची सोय करण्यात आली आहे. या पहिल्या प्रवेश फेरीची अलॉटमेंट यादी अधिकृत संकेतस्थळावर गुरुवार, दि. १० ऑक्टोबर, २०२४ रोजी प्रसिद्ध होणार आहे. ज्यांनी पदवी आणि पदव्युत्तर फार्मसी प्रवेशासाठी कॅप रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन केले त्यांना या प्रवेश फेरीचा लाभ घेता येईल, अशी माहीती संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे यांनी दिली.
      सन २०२४-२५ मध्ये पदवी आणि पदव्युत्तर  फार्मसी प्रवेशाकरीता दि. ७ ऑगस्ट, २०२४ ते २५ सप्टेंबर, २०२४ या कालावधी दरम्यान ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, भरलेले अर्ज स्विकारुन कागदपत्रांची तपासणी, पडताळणी  व निश्चिती करणे आदी  प्रक्रिया पूर्ण झाल्या असून तात्पुरती गुणवत्ता यादी २८ सप्टेंबर, २०२४ रोजी शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या https://cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली. त्यानंतर पहिली फेरी (फर्स्ट कॅप राऊंड) चे ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया शनिवार, दि. ५ ऑक्टोबर, २०२४ पासून ते सोमवार, दि. ७ ऑक्टोबर, २०२४ या दरम्यान होणार आहे. या पहिल्या फेरीमध्ये योग्य आणि पसंतीच्या महाविद्यालयाचे पसंतीक्रम ऑनलाईन भरावे लागणार आहेत. यासाठी विद्यार्थी व पालकांनी पूर्णपणे अभ्यास करून कॅप राऊंड-१ चे ऑप्शन फॉर्म भरणे अत्यंत गरजेचे आहे. महाविद्यालय निवडताना महाविद्यालयात दरवर्षी होणारे प्रवेश, विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल, कॅम्पस प्लेसमेंटची संख्या, वसतिगृह सुविधा, इतर सोयी-सुविधा, उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, संशोधने, मानांकने या महत्वाच्या बाबींचा प्रामुख्याने विचार करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करून करिअरच्या दृष्टीने योग्य महाविद्यालयाची निवड करणे अत्यंत गरजेचे आहे. डॉ. बी.पी. रोंगे यांच्या नेतृत्वाखाली स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसीची स्थापना २००६ साली झाली.  तेंव्हापासून ते आजपर्यंत हे महाविद्यालय यशाच्या पायऱ्या पादाक्रांत करत आहे. सोलापूर आणि आसपासच्या परिसरात फार्मसी महाविद्यालयांची संख्या वाढताना दिसत आहे परंतु एन.बी.ए. चे मानांकन असणारे सोलापूर जिल्ह्यातील फार्मसी क्षेत्रातील एकमेव कॉलेज म्हणजे स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसी, पंढरपूर हे होय. स्वेरीमध्ये असणारी आदरयुक्त शिस्त तसेच ट्रिपलपीई सिस्टिम, निकाल, उच्चशिक्षित प्राध्यापक, प्रशस्त इमारत, भव्य क्रीडांगण, प्लेसमेंट ह्या कॉलेज  निवडताना विचारात घेतल्या जाणाऱ्या गोष्टी या स्वेरीच्या उल्लेखनीय बाजू आहेत. त्यामुळे स्वेरीवर पालकांचा विश्वास आणखी दृढ होताना दिसत आहे.   पहिल्या प्रवेश फेरीचे जागावाटप (अलॉटमेंट) दि. १० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित केले जाणार आहे. पहिल्या फेरीच्या जागावाटपानंतर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन शुक्रवार दि. ११ ऑक्टोबर ते सोमवार दि. १४ ऑक्टोबर रोजी  दुपारी ३.०० वाजेपर्यंत आवश्यक कागदपत्रे व शुल्क भरून प्रवेशाची निश्चिती करावी लागणार आहे. प्रथम वर्ष बी. फार्मसी आणि एम. फार्मसी प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार तसेच डॉ. वृनाल मोरे (९६६५१९६६६६), लताताई पाटील  (७०३८७८३१११)   प्रा. रामदास नाईकनवरे (८३९०९०६१४६) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तसेच फार्मसीला सातत्याने मिळत असलेल्या अभूतपूर्व यशाच्या पार्श्वभूमीवर या पहिल्या फेरीला विक्रमी गर्दी होण्याची चिन्हे दिसत आहेत.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

11 hours ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

2 days ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

6 days ago

मंगळवेढा तालुक्यासाठी ६ कोटी ४५ लाख रुपये फळ पिक विमा मंजूर- आ समाधान आवताडे

पुनर्रचित हवामानावर आधारित फळपेत विमा योजना रब्बी हंगाम २०२३ साठी फळ पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांचा…

1 week ago

चेअरमन अभिजित पाटील यांच्या संकल्पनेतुन माढा कृषी व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

१२ ऑक्टोबर पासून ५ दिवस कृषी,कृषी उद्योग मार्गदर्शन,प्रदर्शन,सांस्कृतिक कार्यक्रम  श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन…

2 weeks ago