पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट ही संस्था शिक्षणात विविध प्रयोग राबवून विद्यार्थ्यांना गुणवत्तेला अधिक परिपक्व बनवत आहे हे सर्वश्रुत आहे. आता स्वेरी ही तंत्रशिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही आपला दबदबा निर्माण करत आहे. हे मागील काही वर्षांपासून विविध क्रीडा स्पर्धाच्या माध्यमातून दिसून येत आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत बेलाटी येथील बी.एम.आय.टी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये आयोजिलेल्या विद्यापीठस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या नेहा सुरेश झिरपे यांनी ७० मुलींमधून तृतीय क्रमांक पटकावला. साऊथ झोनसाठी होणाऱ्या स्पर्धेसाठी नेहा झिरपे आता पात्र ठरल्या आहेत. तसेच त्यांना क्रीडा महोत्सवामध्ये सुद्धा सहभाग होण्याची संधी मिळाली आहे. या विजयामुळे डिसेंबर २०२४ मध्ये गडचिरोली येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठ स्तरीय स्पर्धेसाठी नेहा झिरपे यांची निवड झाली आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांची खेळासाठी सर्व विद्यार्थ्यांना सुरुवातीपासूनच सातत्याने प्रेरणा मिळत आहे, याचाही फायदा झिरपे यांना झाला. शिक्षणाबरोबरच झिरपे यांनी खेळाकडे लक्ष देवून, परिश्रम केले आणि यशाला गवसणी घातली. झिरपे यांना क्रीडा प्रशिक्षक दीपक भोसले व मार्गदर्शक प्रा.संजय मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी स्वेरीमध्ये शिक्षणाबरोबरच नियमित योगा करून घेतला जातो स्वेरीमध्ये अत्याधुनिक सुविधा असलेल्या स्वतंत्र जिमची देखील सोय आहे, याचा विद्यार्थ्यांना नेहमीच फायदा होतो. सांघिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या सई प्रमोद मोरे व प्रियांका धनाजी चव्हाण व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या जुई अमोल गवसाने यांनी देखील दहा संघांमध्ये तृतीय क्रमांक पटकावल्यामुळे त्या आंतरविद्यापीठ स्तरांमध्ये सहभागी होणार आहेत. बुद्धिबळ स्पर्धेत यशस्वी झाल्यामुळे स्वेरीच्या वतीने नेहा झिरपे, सई मोरे, प्रियांका चव्हाण व जुई गवसाने यांचा स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यशस्वी स्पर्धकांचे स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम एम. पवार, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, स्वेरी मध्ये असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…