ताज्याघडामोडी

कर्मयोगी इंस्टिट्यूटच्या सहा विद्यार्थ्यांची निवड.

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (अभियांत्रिकी) महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांची पुणे येथील आयटी प्रेन्युअर या नामांकित प्रशिक्षण देणार्‍या कंपनी मध्ये निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली.
या कंपनीने घेतलेल्या मुलाखातीमधून कम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग विभागातील अंतिम वर्षामध्ये शिकत असणार्‍या वृशाली बाबर, संजीवनी बाबळसुरे, विशाल चव्हाण, मनीषा म्हेत्रे, प्रज्ञा कळकुंबे व श्रुती ठाकरे या विद्यार्थ्याची निवड केली आहे.
आयटी प्रेन्युअर ही पुण्यामधील सर्वोत्कृष्ट आयटी प्रशिक्षण संस्थांपैकी एक आहे जी आयटी क्षेत्रात नवीन कौशल्ये आणि प्रतिभांचा परिचय करून देण्यासाठी समर्पित आहे. आयटी क्षेत्रातील नोकरीच्या संधी आणि त्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये यांच्या विकासाच्या सर्व स्तरांवर अद्वितीय प्रशिक्षण देणारी व विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणारी संस्था आहे. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत दिले जाणारे प्रशिक्षण हे कार्पोरेट क्षेत्रात नोकरी लागण्यासाठी अतिशय पूरक व उपयोगी होत आहे असे निवड झालेल्या विद्यार्थी आवर्जून संगितले.
श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे विश्वस्त श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहसीन शेख, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, विभागप्रमुख प्रा. अनिल बाबर, डॉ. एस व्ही एकलारकर, प्रा. दीपक भोसले, प्रा. एस एम लंबे, प्रा. अभिनंदन देशमाने तसेच ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे समन्वयक प्रा. सुशील कुलकर्णी, प्रा. व्ही एल जगताप, प्रा. दत्तात्रय चौगुले, प्रा. योगेश माने व इतर सर्व प्राध्यापक यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

11 hours ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

2 days ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

6 days ago

मंगळवेढा तालुक्यासाठी ६ कोटी ४५ लाख रुपये फळ पिक विमा मंजूर- आ समाधान आवताडे

पुनर्रचित हवामानावर आधारित फळपेत विमा योजना रब्बी हंगाम २०२३ साठी फळ पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांचा…

1 week ago

चेअरमन अभिजित पाटील यांच्या संकल्पनेतुन माढा कृषी व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

१२ ऑक्टोबर पासून ५ दिवस कृषी,कृषी उद्योग मार्गदर्शन,प्रदर्शन,सांस्कृतिक कार्यक्रम  श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन…

2 weeks ago