ताज्याघडामोडी

१३० कोटींच्या दर्शन मंडपास शिखर समितीची मंजुरी : आ. समाधान आवताडे यांची माहिती तिरुपतीच्या धर्तीवर टोकन दर्शन सोय होणार : ६ हजार भाविकांसाठी वातानुकूलित दर्शन मंडप

पंढरपूर
येथील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी १३० कोटी रुपयांच्या दर्शन मंडप आणि स्काय वॉक आराखड्यास तीर्थक्षेत विकास आराखडा शिखर समितीने मंजुरी दिली आहे, लवकरच या आराखड्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल. हा दर्शन मंडप उभा राहिल्यानंतर टोकन दर्शन सुविधा सुरु करण्यात येईल. ६ हजार भाविकांची सोय होणार आहे, अशी माहिती आ. समाधान आवताडे यांनी दिली.

यासंदर्भात अधिक माहिती देताना आ.आवताडे म्हणाले कि, तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीची मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थतीतीत बैठक संपन्न झाली. या बैठकीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री अनिल पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. समाधान आवताडे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या दर्शन मंडप आणि स्काय वॉक आराखड्यास शिखर समितीने मंजुरी दिली. भाविकांची वाढती संख्या आणि दर्शन रांगेत सुविधा पुरवताना प्रशासनावर येणारा ताण लक्षात घेता या आराखड्यास तात्काळ मंजुरी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार या शिखर समितीची बैठक झाली आणि १३० कोटींच्या विकास आराखड्यास मंजुरी मिळाली. यानंतर लवकरच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या आराखड्यास मंजुरी मिळेल आणि लवकरात लवकर पुढील कारवाई सुरु होईल. या दर्शन मंडप आराखड्यात १६ हजार चौरस मीटरचा २ मजली दर्शन मंडप, आणि दर्शन मंडप ते विठ्ठल मंदिर पूर्व प्रवेशद्वार असा १०५० मीटर्स लांबीचा स्काय वॉक, दर्शन मंडप वातानुकूलित, दर्शन मंडपास ६ लिफ्ट आणि २ रॅम्प, cctv, ३० पास स्कॅनींग काउंटर, हिरकणी कक्ष, उपहार गृह, वैद्यकीय सेवा,स्त्री, पुरुष आणि दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, प्रथमोपचार सुविधा, अग्निशमन यंत्रणा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणार आहे, भाविकांची गरज लक्षात घेता भविष्यात दर्शन मंडपाची क्षमता वाढवण्यात येणार आहे. सहा हजार भाविकांची क्षमता असली तरी आताच त्यात वाढ करून १० हजार भाविकांची क्षमता वाढवावी अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. या दर्शन मंडपाची देखभाल पंढरपूर नगरपालिका करणार आहे, असेही आ. आवताडे यांनी सांगितले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

11 hours ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

2 days ago

कर्मयोगीच्या तब्बल ११० विद्यार्थ्यांची झेंसार कंपनी मध्ये निवड.

श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षा मध्ये शिकत असणार्‍या…

7 days ago

मंगळवेढा तालुक्यासाठी ६ कोटी ४५ लाख रुपये फळ पिक विमा मंजूर- आ समाधान आवताडे

पुनर्रचित हवामानावर आधारित फळपेत विमा योजना रब्बी हंगाम २०२३ साठी फळ पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांचा…

1 week ago

चेअरमन अभिजित पाटील यांच्या संकल्पनेतुन माढा कृषी व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

१२ ऑक्टोबर पासून ५ दिवस कृषी,कृषी उद्योग मार्गदर्शन,प्रदर्शन,सांस्कृतिक कार्यक्रम  श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन…

2 weeks ago