ताज्याघडामोडी

राष्ट्रवादी कॉग्रेस (श.प.) पक्षाच्या अल्पसंख्यांक विभाग जिल्हा उपाध्यक्षपदी गुलाब मुलाणी यांची निवड  खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याहस्ते निवडीचे पत्र प्रदान

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्याक विभाग जिल्हा उपाध्यक्षपदी पंढरपुर तालुक्यातील कोर्टी येथील गुलाब मुलाणी यांची निवड करण्यात आली आहे.या विभागाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष जाकीर शेख यांनी या निवडीची घोषणा केली असून खा.धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते गुलाब मुलाणी या निवडीबाबतचे पत्र प्रदान करण्यात आले.गुलाब मुलाणी यांनी यापूर्वी राष्ट्रवादी कॉग्रेस अल्पसंख्याक विभागाचे पंढरपुर तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.कट्टर मोहिते पाटील समर्थक अशी त्यांची ओळख असून पक्षाचे ध्येयधोरणे जनतेपर्यंत आणखी पोहिचविण्यात गुलाब मुलाणी हे समर्पक भूमिका पार पडतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष रवी पाटील,मा.जि.प.सदस्य वसंत देशमुख,युवकचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे,दीपक वाडदेकर,ओबीसी जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा माळी,पंढरपुर तालुकाध्यक्ष संदीप मांडवे,मा.शहर अध्यक्ष सुधीर भोसले,जिल्हा संघटक रशीद मुलाणी मा.ग्रा.प.सदस्य सतीश देशमुख,विद्यार्थी सेलचे जिल्हध्यक्ष सागर पडगळ,युवक तालुका कार्याध्यक्ष धीरज डांगे आदी उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आमदार आवताडेंनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत घेतली प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक

महिलांच्या अर्जातील त्रुटी दूर करून सर्व पात्र महिलांना लाभ देण्याच्या सूचना केंद्र व राज्य सरकारच्या…

1 hour ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्ष सोलापूर जिल्हा ओबीसी विभाग कार्यकारिणी बरखास्त

नवीन कार्यकारणीसाठी मुलाखत घेऊन निवडी करणार - अरुण तोडकर  राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्ष सोलापूर…

1 day ago

‘अभियंता दिना’ निमित्त स्वेरीत रक्तदान शिबीर संपन्न राष्ट्रीय सेवा योजनेचा उपक्रम

पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर (ऑटोनॉमस) व सोलापूर विद्यापीठ संलग्नित असलेल्या…

2 days ago

अभियंत्यांचे जनक -सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील चिक्कबळ्ळापूर तालुक्यातील मुद्देनहळ्ळी या गावी १५ सप्टेंबर १८६०…

4 days ago

स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीची ‘न्यु लाईफ फार्मा’ या कंपनीला औद्योगिक भेट

पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी मधील…

6 days ago

‘राष्ट्रीय क्रीडा दिना’निमित्त स्वेरीत बुद्धिबळ आणि बॅडमिंटन स्पर्धा संपन्न

पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय…

1 week ago