ताज्याघडामोडी

‘अभियंता दिना’ निमित्त स्वेरीत रक्तदान शिबीर संपन्न राष्ट्रीय सेवा योजनेचा उपक्रम

पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर (ऑटोनॉमस) व सोलापूर विद्यापीठ संलग्नित असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ‘अभियंता दिना’चे औचित्य साधून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात पदविका (डिप्लोमा) आणि पदवी (डिग्री) अशा दोन्ही अभियांत्रिकी महाविद्यालयातील एकूण २६९ विद्यार्थी, विद्यार्थींनी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ऐच्छीक रक्तदान केले.
      कोणताही शैक्षणिक कार्यक्रम असो अथवा सामाजिक, स्वेरी विविध उपक्रमात सातत्याने सहभाग घेत असते. स्वेरी अंतर्गत असलेल्या पदवी अभियांत्रिकीच्या राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गंत ‘अभियंता दिना’चे औचित्य साधून या ‘ऐच्छीक रक्तदान शिबीरा’चे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन साताऱ्यातील ‘टॉप गीअर’चे संचालक श्रीकांत पवार यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी चेअरमन संजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय ब्लड सेंटर, सोलापूर या रक्तपेढीला आमंत्रित करण्यात आले होते. स्वेरीच्या पदविका (डिप्लोमा) आणि पदवी (डिग्री) अभियांत्रिकी महाविद्यालयात दोन वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. पदवी महाविद्यालयातून १६९ जणांनी तर पदविका महाविद्यालयातून १०० जणांनी असे मिळून दोन्ही महाविद्यालयातील विद्यार्थिनी, विद्यार्थी व प्राध्यापक असे मिळून एकूण २६९ जणांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले. रक्तदान केल्यानंतर रक्तदात्यांच्या आरोग्याची काळजी संबंधित रक्तपेढीतील वैद्यकीय अधिकारी व त्यांचे कर्मचारी वर्ग घेत होते. रक्तदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. एम. एम. आवताडे, डॉ. धनंजय चौधरी, प्रा. के.पी. पुकाळे, प्रा. एस.डी.माळी, प्रा. जी. जी. फलमारी, प्रा. एम.ए.सोनटक्के, प्रा. एस. बी. खडके, प्रा. बी.टी. गडदे, प्रा. पी.व्ही. पडवळे, प्रा. एस. डी. इंदलकर, प्रा. एस. एम. शिंदे व स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी प्रतिनिधी वैकुंठी जाधव, ऋषिकेश सातपुते तसेच  विविध विभागातील  विद्यार्थी स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले. यावेळी उद्योजिका सौ. श्रद्धा पवार, संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, माजी अध्यक्ष व विश्वस्त एन.एस.कागदे, माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, माजी अध्यक्ष व विश्वस्त विजय शेलार, विश्वस्त एच.एम.बागल, विश्वस्त बी. डी. रोंगे, युवा विश्वस्त प्रा.सुरज रोंगे, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार, डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. रंगनाथ हरीदास, अधिष्ठाता, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आमदार आवताडेंनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत घेतली प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक

महिलांच्या अर्जातील त्रुटी दूर करून सर्व पात्र महिलांना लाभ देण्याच्या सूचना केंद्र व राज्य सरकारच्या…

1 hour ago

राष्ट्रवादी कॉग्रेस (श.प.) पक्षाच्या अल्पसंख्यांक विभाग जिल्हा उपाध्यक्षपदी गुलाब मुलाणी यांची निवड  खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याहस्ते निवडीचे पत्र प्रदान

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्याक विभाग जिल्हा उपाध्यक्षपदी पंढरपुर तालुक्यातील कोर्टी येथील गुलाब मुलाणी यांची…

1 day ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्ष सोलापूर जिल्हा ओबीसी विभाग कार्यकारिणी बरखास्त

नवीन कार्यकारणीसाठी मुलाखत घेऊन निवडी करणार - अरुण तोडकर  राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्ष सोलापूर…

1 day ago

अभियंत्यांचे जनक -सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील चिक्कबळ्ळापूर तालुक्यातील मुद्देनहळ्ळी या गावी १५ सप्टेंबर १८६०…

4 days ago

स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीची ‘न्यु लाईफ फार्मा’ या कंपनीला औद्योगिक भेट

पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी मधील…

6 days ago

‘राष्ट्रीय क्रीडा दिना’निमित्त स्वेरीत बुद्धिबळ आणि बॅडमिंटन स्पर्धा संपन्न

पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय…

1 week ago