पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी मधील विद्यार्थ्यांनी पिंपरी चिंचवड (जि. पुणे) येथील ‘न्यु लाईफ फार्मा प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीला नुकतीच औद्योगिक भेट दिली.
स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांच्या नेतृत्वाखाली या औद्योगिक भेटीचे आयोजन केले होते. वर्गातील शिक्षणाच्या पलीकडे जावून सध्याच्या बाजारपेठेतील वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्याच्या हेतूने आणि अभ्यासाचा एक भाग असलेल्या या ‘औद्योगिक भेटी’मुळे विद्यार्थ्यांना जागतिक बाजारपेठेतील सध्याची गरज, उद्योगाची भविष्यातील परिस्थिती आणि उद्योगात लागू होत असलेल्या नवीन तंत्रज्ञानाबद्दल अभ्यासपूर्ण माहिती मिळते. अशा या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यात मोठा हातभार लागतो. व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये ‘औद्योगिक भेटी’ हा एक आवश्यक भाग आहे. त्यामुळे अशा ‘शैक्षणिक भेटी’ विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्राशी संबंधित संकल्पनांच्या व्यावहारिक दृष्टिकोनासह वास्तविक कामकाज व औद्योगिक वातावरणाचा परिचय व्हावा या हेतूने आयोजित केल्या जातात. औद्योगिक भेटीमध्ये ‘न्यु लाईफ फार्मास्युटिकल’ च्या वर्क मॅनेजर माधुरी देशमुख यांनी स्वेरी फार्मसीच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे स्वागत करून कंपनीची संपूर्ण माहिती दिली. औषध निर्माण क्षेत्रामध्ये ‘न्यु लाइफ फार्मा प्रायव्हेट लिमिटेड‘ ही कंपनी १९७३ पासून कार्यरत आहे. या भेटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध औद्योगिक केंद्रांना लागणारे साहित्य, औद्योगिक क्षेत्रातील कच्चा माल आणि पक्का माल यांची ट्रान्सपोर्ट व विक्री, किरकोळ विक्री तसेच कच्चामाल व त्यांचे कोठार, प्रोडक्शन विभाग, क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी एश्युरन्स आदी विभागात चालणाऱ्या कामाबद्दल व तिथे वापरल्या जाणाऱ्या विविध उपकरणांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. या औद्योगिक भेटीमुळे इंडस्ट्री बद्दल विद्यार्थ्यांना असणारे कुतूहल व मनातील शंकांचे निरसन झाले. तसेच उत्पादन व्यवस्थापक राजेश जाधव व प्रशांत सस्ते यांनी विविध बाबींची विस्तृतपणे माहिती दिली. या औद्योगिक भेटीसाठी स्वेरी फार्मसीचे प्लेसमेंट ऑफिसर प्रा. प्रदीप जाधव यांनी समन्वय साधला. तसेच या औद्योगिक भेटीसाठी डॉ. दत्तात्रय यादव, प्रा. रितेश व्यवहारे, प्रा. शुभांगी कागदे, प्रा. स्नेहल पाटील, प्रा. संध्या गुजरे यांच्यासह जवळपास ५२ विद्यार्थी सहभागी झाले होते. एकूणच अभ्यासाच्या दृष्टीने या औद्योगिक भेटीला विशेष महत्व आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…