ताज्याघडामोडी

स्वेरीत ‘ऑलम्पस २ के २४’ या तंत्रस्पर्धेच्या पोस्टरचे उदघाटन येत्या दि. १५ व १६ सप्टेंबर रोजी स्वेरीत ‘ऑलम्पस २ के २४’ या तांत्रिक स्पर्धेचे आयोजन

पंढरपूर स्वेरीत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे सुप्त गुण व कौशल्ये सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारे विविध उपक्रम राबवले जातात. त्यातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळत असते. याचाच एक भाग म्हणून येत्या दि. १५ व दि. १६ सप्टेंबर २०२४ रोजी स्वेरीमध्ये  ऑलम्पस २ के २४’ या तांत्रिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

       शिक्षक दिनाचे औचित्य साधूनपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे व इतर मान्यवरांच्या हस्ते या ऑलम्पस २ के २४’ या तांत्रिक स्पर्धेच्या पोस्टरचे उदघाटन करण्यात आले. गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित ऑलम्पस २ के २४’ या तांत्रिक स्पर्धेत जवळपास २३ इव्हेंट्स आयोजित केले आहेत  ज्यात ड्रॉ-कॅडटेक्नो-मेक क्विझमेक-टेक एक्सटेम्पोरब्रीज मेकिंगकॅड रेससिव्हिल एक्सटेम्पोरमिनी हॅकाथोनकोड वॉरपोस्टराईज- पोस्टर प्रेझेंटेशनप्रोग्राम मनियापेपर प्रेझेंटेशनअॅग्रो चॅलेंज प्रोजेक्ट स्पर्धाकॅम्पस ड्राईव्हजस्ट अ मिनिट टायपिंग इत्यादी स्पर्धांचा समावेश आहे. विजेत्यांना एकूण एक लाखांपर्यंतची रोख बक्षिसेस्मृतिचिन्हे व प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. या तांत्रिक स्पर्धेत अभियांत्रिकी तसेच पदविका अभियांत्रिकीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थी अध्यक्षा सोनाली करवीरउपाध्यक्ष अनिल पिसे व तुषार बनसोडेविद्यार्थी सचिव राज रोंगेसहसचिव स्नेहा पिसेखजिनदार ओंकार जाधवसहखजिनदार प्रतीक गोडसेअनिकेत वाघमोडे यांच्यासह सर्व विभागप्रमुख आणि विद्यार्थी परिश्रम घेत आहेत. ऑलम्पस २ के २४’ या स्पर्धात्मक कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी समन्वयक प्रा. दिगंबर काशीद (८२०८७२४२६६)प्रा. सचिन काळे (९९६०११८५८०)प्रा. सागर वाघचवरे (९६६५१८७८७५)प्रा. धनराज डफळे (९७६८५१५०२३)प्रा. पृथ्वीराज गुंड (८७९३०४३०८३) व प्रा. निमिषा देवल (९६८९६३८३४४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. यावेळी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगेसंस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगेमाजी अध्यक्ष व विश्वस्त एन. एस. कागदेयुवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगेकॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवारउपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवारडिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळबी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम. जी. मणियारडी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. एस. व्ही. मांडवेसर्व अधिष्ठाताविभागप्रमुखप्राध्यापकविद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

1 day ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

1 day ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago