ताज्याघडामोडी

स्वेरीचे सामाजिक कार्य कौतुकास्पद -अधिक्षिका श्रीमती राजश्री गाडे स्वेरीतर्फे नवरंगे बालकाश्रमाला पाणी शुद्धीकरण यंत्र भेट

पंढरपूर –‘विशेष करून ग्रामीण भागात स्वेरी’ ही शिक्षणसंस्था शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबरोबरच सामाजिक कार्यात देखील सातत्याने सहभाग घेवून स्तुत्य कार्य करत असते. स्वेरीचे विद्यार्थी प्रत्येक सामाजिक व विधायक कार्यात तहान भूक विसरून मनापासून कार्य करत असतात. स्वेरीचे सामाजिक कार्य खरोखर कौतुकास्पद असते.’ असे प्रतिपादन पंढरपूर शहरातील नवरंगे बालकाश्रम व्यवस्थापनाच्या अधिक्षिका श्रीमती राजश्री गाडे यांनी केले.

       स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानेस्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगपंढरपूरने सामाजिक सेवेची आणखी एक चुणूक दाखवत एक स्तुत्य उपक्रम राबवला. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखालीकॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार आणि उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या सहकार्याने इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाच्या इलाईट फोरम’ मार्फत पंढरपूर मधील वा.बा. नवरंगे बालकाश्रमाला पाणी शुद्धीकरण यंत्र  भेट देण्यात आले. यावेळी व्यवस्थापनाच्या  अधिक्षिका श्रीमती राजश्री गाडे मार्गदर्शन करत होत्या. सामाजिक कार्य करताना आपल्या देण्याने दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो भेट वस्तूच्या किमतीच्या कितीतरी पटीने अधिक असतो. नवरंगे बालकाश्रमाच्या व्यवस्थापनाकडून अधिक्षिका राजश्री गाडेव्यवस्थापक सुचित्रा पवार आणि लेखाधिकारी धर्मराज डफळे यांनी स्वेरीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने करण्यात आलेली ही कृती महाविद्यालयाच्या समाज कल्याणासाठीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे प्रतीक आहे. हे पाणी शुद्धीकरण यंत्र बालकाश्रमातील मुलांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. नवरंगे बालकाश्रमाच्या व्यवस्थापनाने स्वेरीच्या या भेटवस्तू बाबत आभार मानले. सदरची वस्तू ही बालकाश्रमातील मुलांचे आरोग्य जतन करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाने एकता आणि सामूहिक जबाबदारीचा संदेश दिलाजो स्वातंत्र्य दिनाच्या खऱ्या अर्थाला अधोरेखित करतो. स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे समाजाच्या प्रगतीसाठी अविरतपणे कार्य करत आहे. या देणगी समारंभात बालकाश्रमाचे लेखाधिकारी धर्मराज डफळेइलाईट फोरमचे समन्वयक प्रा. एस. आर. वाघचवरेप्रा. एम.ए. सोनटक्केप्रा. एस.एस. गावडेप्रा. ए.ए. गरडइलाईट फोरमचे अध्यक्ष तुषार बर्ले आणि गिरीजा देशमुख यांच्या सह इलाईट फोरमचे सदस्य उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago