पंढरपूरः ‘आयुष्यात उत्तमरित्या करीअर करायचे असेल तर शिक्षकांनी आणि मोठ्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालणे हे फायदेशीर ठरते. आपल्यावर संस्कार करणाऱ्या शिक्षकांचे ऋण आपण आयुष्यभर जपले पाहिजेत. पतंग कितीही उंच उडवा परंतु त्यांची दोरी आपल्या हातामध्ये असते. त्याप्रमाणे जगात ज्ञान प्रचंड आहे परंतु मेंदूचा वापर करून फायद्याचे तेवढे ज्ञान घ्यायचे असते. जो मेंदूचा वापर अधिक करतो तोच हुशार बनतो. यासाठी स्वतःभोवती घडणाऱ्या गोष्टी आपण चिकित्सकपणे तपासल्या पाहिजेत. आपले व्यक्तिमत्व घडवण्यात शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो. आपले विचार, वर्तन, वागणे, बोलणे हे सर्व आपल्या व्यक्तिमत्त्वातून दिसून येत असते. यासाठी सत्य, अहिंसा, प्रेम, न्याय, मानवता सार्वजनिक मूल्ये समजून घेऊन त्या दिशेने वाटचाल करणे गरजेचे आहे. ऑनलाइन मिळते ती माहिती असते पण ज्ञान हे वर्गात शिक्षकांकडूनच मिळत असते. जे विद्यार्थी नम्रतेने राहतात ते विद्यार्थी आयुष्यात खूप मोठे होतात. आपल्याकडे कितीही ज्ञान असो, जर नम्रताच अंगी नसेल तर त्या अथांग ज्ञानाचा उपयोग नाही. नम्रता ही शिक्षकांकडून मिळत असते. एकूणच विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो.’ असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भव्य खुल्या रंगमंचामध्ये भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची १३६वी जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजिलेल्या ‘शिक्षक दिना’च्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे हे मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे हे होते. महाराष्ट्र गीत आणि स्वेरीच्या सुमधुर गीताने व डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. संदेश फलकावरून संचालक डॉ. काळवणे यांनी ‘मेहनत करा, यश तुमचेच आहे’ हा संदेश विद्यार्थ्यांना दिला. प्रास्ताविकात संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून ‘शिक्षकांचे समाजाच्या प्रगतीमध्ये असणारे योगदान स्पष्ट करताना म्हणाले की, ‘विद्यार्थी हा केवळ विद्यार्थी नसून तो शिक्षकांच्या भूमिकेत देखील आहे. त्यामुळे त्याला आदराचे स्थान दिले जाते. विद्यार्थ्यांनी करिअर घडवताना भावनीकतेला थारा देवू नये तसेच विद्यार्थी व शिक्षक यांचे आपसातील संबंध हे आदराचे असावे’ असे सांगून त्यांनी विद्यार्थी दशेतील अनुभव सांगितले. पुढे बोलताना संचालक डॉ. काळवणे म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड असतो त्यामुळे आपल्या विकासाला अडथळा येतो यासाठी न्यूनगंड बाजूला झटकून कार्य केले पाहिजे. जर आपले मन परिवर्तन करायचे असेल तर वाचन आवश्यक आहे. कारण वाचन, लेखन आणि भाषण ही मुलभूत कौशल्ये आपल्यात असणे आवश्यक आहे आणि ही कौशल्ये विकसित करण्याचे काम ‘वाचन’ संस्कृती करते. यासाठी मनात जे आहे ते कागदावर उतरवले पाहिजे, त्यातून माणूस हा भविष्यात भारताचा सक्षम नागरिक बनतो.‘ असे सांगून त्यांनी शिक्षण क्षेत्रातील थोर महात्म्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनीही शिक्षक दिनाचे महत्व पटवून दिले. अध्यक्षस्थानावरून बोलताना संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांना समजून घेणे ही अवघड कला शिक्षकांकडे असते. शिक्षकांना वेळ प्रसंगी कठोर बनावे लागते. यामागचा हेतू एवढाच की विद्यार्थी शिकून शहाणा झाला पाहिजे. यासाठी शिक्षक हा स्वतःमध्ये असलेल्या सामर्थ्याचा वापर विद्यार्थी घडविण्यासाठी करतो.’ असे सांगून त्यांनी बाबा आमटे, संत गाडगेबाबा अशा अनेक संताच्या कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी पीएच. डी. प्राप्त केल्याबद्धल एम.बी.ए.च्या डॉ. मिनल भोरे व चारही महाविद्यालयांतील प्राचार्यांचा व प्राध्यापकांचा ‘शिक्षक दिना’ निमित्त पाहुण्यांच्या व विद्यार्थ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी वेणुनगर येथील श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय नरसाळे व सिद्धेश्वर बंडगर, डॉ. गणेश संकपाळ, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त एन.एस. कागदे, युवा विश्वस्त प्रा.सुरज रोंगे, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार, संस्थेअंतर्गत असलेल्या डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.एम.जी.मणियार, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा.एस.व्ही.मांडवे, अभियांत्रिकीच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी प्रतिनिधी राधिका पाटील, गायत्री जाधव, सानिका भांगे, विवेक चव्हाण, सुशांत शेटे, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. सृष्टी लामगुंडे व मानसी लोंढे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ.यशपाल खेडकर यांनी आभार मानले.
चौकट:
‘स्वेरीसारखे बहारदार सूत्रसंचालन मी कुठेच पाहिले नाही. असे सांगून प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ.यशपाल खेडकर यांच्या सूत्रसंचालनाचे प्रमुख पाहुण्यांनी मनभरून कौतुक केले तसेच मोबाईलचा वापर हे नुसते वेड नसून एक आजार आहे. यासाठी त्याचा गरजेपुरताच वापर करावा.’ असे आवाहनही संचालक डॉ. काळवणे यांनी केले
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…