ताज्याघडामोडी

पंढरपूर आणि मंगळवेढा शहरातील विविध विकास कामांसाठी प्रत्येकी ५ कोटी रुपये मंजूर : आ. समाधान आवताडे वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून राजमाता अहिल्यादेवी २५ लाख रुपये , साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी १५ लाख रुपये

पंढरपूर

पंढरपूर आणि मंगळवेढा शहरातील विविध विकास कामांसाठी राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून प्रत्येकी ५ असे एकूण १० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यामध्ये पंढरपूर शहरातील राजमाता अहिल्यादेवी होळकर २५, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी १५ लाख रुपये शिवाय मंगळवेढा शहरातील ४० तर पंढरपूर शहरातील ४७ कामांसाठी हा निधी मंजूर असल्याची माहिती आ. समाधान आवताडे यांनी दिली.

यासंदर्भात अधिक माहिती देताना आ. आवताडे म्हणाले कि, राज्य शासनाच्या नगरविकास विभागातील वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत पंढरपूर नगरपरिषदेच्या हद्दीतील विकास कामांसाठी ५ कोटी आणि मंगळवेढा नगरपरिषदेच्या हद्दीतील विकास कामासाठी ५ कोटी असे एकूण १० कोटी रुपये मंजूर झाल्याचा आदेश ३ सप्टेंबर रोजी निघाला आहे. या निधीतून पंढरपूर शहरातील राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकातील सुधारणांसाठी २५ लाख रुपये, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या कामासाठी १५ लाख रुपये, लिंगायत स्मशानभूमी सुधारणा साठी १५ लाख रुपये, हजरत बाराईमाम दर्ग्यातील कामांसाठी १० लाख रुपये, जिजाऊ नगर, एकता नगर, मंगळवेढा नगर,इसबावी येथील शिक्षक सोसायटी, चंद्रमा रेसिडेन्सी, बालाजी नगर,रुक्मिणी नगर, पदमशाली धर्मशाळा येथील खुल्या जागा विकसित करणे, याशिवाय २७ रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरणसाठी प्रत्येकी १० लाख रुपये, जुनी वडार गल्ली येथे सभापंडप,पद्मावती झोपडपट्टी,अण्णाभाऊ साठेनगर, विश्वेश्वर नगर, नवीन कोर्टाजवळ ख्रिस्ती कॉलनी, भगवान नगर, परदेशी नगर येथे सभामंडप बांधण्यासाठी प्रत्येकी १० लाख रुपये,मटण मार्केट येथे फुटपाथ करणे अशा कामासाठी एकूण ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देताना आ. अवताडे म्हणाले कि, पंढरपूर शहराबरोबर मंगळवेढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर हायमास्ट बसवणे, लतिफ़बाबा दर्गाह जवळ शादी खाना बांधकामासाठी ५० लाख रुपये, दर्गा परिसरात संरक्षित भिंत बांधणे,कृष्णानगर, संभाजी नगर, गोवे प्लॉट, दामाजी हौसिंग सोसायटी येथे पथदिवे, विजेचे खांब बसवणे, दत्तू गल्ली, खंडोबा गल्ली, पटेल घर, नागणे गल्ली, मुढे गल्ली, मोहिनी बुवा मंदिर, बुरुड गल्ली, आठवडा बाजार, रोहिदास चौक, माने गल्ली, बोराळे नाका चौक, शिवाजी तालीम, मेटकरी गल्ली, मंगळवेढा न्यायालय ते उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कारखाना चौक ते बठाण रोड, खंडोबा गल्ली, माळी गल्ली, सराफ गल्ली, कोंडुभैरी गल्ली अशा भागातील रस्ते काँक्रीटीकरण, भूमिगत ड्रेनेज, नगरपालिका सभामंडप बांधणे,पत्राशेड बांधणे, नाणे वाडी येथे सभामंडप बांधणे, संरक्षक भिंत बांधणे पथदिवे बसवणे अशा विविध कामांसाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे.

राज्य शासनाच्या वैशिट्यपूर्ण योजनेतून दोन्ही शहरांसाठी हा १० कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे. यामुळे दोन्ही शहरातील नारिकाना या निधीतून मूलभूत सुविधा मिळतील असा दावा आ. समाधान आवताडे यांनी केला आहे.
कोट.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे काम पंढरपूरमध्ये सुरू आहे. आ. समाधान आवताडे यांच्या माध्यमातून या स्मारकासाठी वैशिष्टयपूर्ण योजनेतून 15 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. यामुळे आता या निधीतून अण्णाभाऊंच्या स्मारकाचे काम गतीने पूर्ण होईल. गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूर येथील अण्णाभाऊंच्या स्मारकाचे काम प्रलंबित होते, ते पूर्ण होईल.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

1 day ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

1 day ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago