ताज्याघडामोडी

स्वेरीच्या चार विद्यार्थ्यांची ‘किर्लोस्कर चिलर्स’ या नामांकित कंपनीत निवड

पंढरपूरः किर्लोस्कर चिलर्स’ या नामांकित कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विभागातील चार विद्यार्थ्यांची कॅम्पस ड्राईव्ह मधून निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.

       ‘किर्लोस्कर चिलर्स’ या नामांकित कंपनीच्या निवड समितीने निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून स्वेरीच्या प्रियांका शंकर देवमारेमानसी नितीन चव्हाणशुभम ज्ञानेश्वर तोडकरी व सुधीर राजकुमार राऊत या चार विद्यार्थ्यांची  निवड केली. किर्लोस्कर चिलर्स’ ही कंपनी २० वर्षांपेक्षा अधिक जुनी आहे. ही कंपनी प्रामुख्याने एचव्हीएसी अँड आर या क्षेत्रात कार्यरत आहे. किर्लोस्कर या नामांकित ग्रुप मधील ही एक कंपनी आहे. स्वेरीचे माजी विद्यार्थी देखील या कंपनीत कार्यरत आहेत. अशा नामवंत कंपनीत स्वेरीचे विद्यार्थी रुजू होतातहे देखील विशेष महत्वाचे आहे. स्वेरी अभियांत्रिकीमध्ये विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या प्लेसमेंटसाठी येत असतात आणि कंपनीसाठी पात्र अशा विद्यार्थ्यांची निवड करत असतात. त्यामुळे विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. या विद्यार्थ्यांना स्वेरीमध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट मधील व विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगेसंस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगेउपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारीस्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवारअभियांत्रिकी पदवीच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवारस्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्यअधिष्ठाताविभागप्रमुखप्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारीविद्यार्थी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्युवमधून किर्लोस्कर चिलर्स’ या कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago