ताज्याघडामोडी

डी. फार्मसी प्रवेशासाठी ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू स्वेरीमध्ये सदर रजिस्ट्रेशनची मोफत सोय

पंढरपूरः गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डी. फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर म्हणुन स्वेरीच्या डी. फार्मसी महाविद्यालयांना मान्यता मिळाली असून गुरुवार (दि. ०८ ऑगस्ट २०२४) पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया बुधवार  दि. २८ ऑगस्ट २०२४ पर्यंत चालणार आहे, अशी माहिती प्राचार्य प्रा. सतीश मांडवे यांनी दिली.
     शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये डी.फार्मसी प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, भरलेले अर्ज स्विकारुन प्रमाणपत्रे, कागदपत्रांची तपासणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रिया करण्याकरिता मुंबई येथील मा. संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य (डी.टी.ई) यांचे अधिकृत केंद्र (एफ.सी. क्र.-६५०५) म्हणून स्वेरीच्या डी. फार्मसी महाविद्यालयास मान्यता मिळाली आहे. पंढरपूर पंचक्रोशीतील व ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी प्रथम वर्ष डी. फार्मसी प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन, पालकांचा होणारा संभ्रम, संबंधीत कागदपत्रे जमविताना होणारी अडचण व शंका याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सुविधा केंद्र सुरु केले आहे. यंदाचे हे डी. फार्मसीचे १६ वे वर्ष असून महाविद्यालयाने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. प्रथम वर्ष डी. फार्मसी प्रवेशाकरिता बारावी सायन्स परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ही प्रकिया दि. ०८ ऑगस्ट २०२४ पासून ते दि. २८ ऑगस्ट २०२४ रोजी सायं. ५.०० वाजेपर्यंत चालणार  आहे. याचा लाभ बारावी सायन्स मधून उत्तीर्ण विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी घेण्याचे आवाहन केले आहे. या कालावधीत प्रमाणपत्रांची पडताळणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रियेनंतर मुख्य कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया चालू होणार आहे. स्वेरी फार्मसी मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्यामुळे आणखी एका डी. फार्मसी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. डी. फार्मसीच्या प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी मोबा.क्र. ९९२१७६२७२८ व  ९५१८९८४१८२  यावर संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य प्रा. सतीश मांडवे यांनी केले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली डी. फार्मसीच्या फॅसिलिटेशन सेंटरमध्ये सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून येत आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago