ताज्याघडामोडी

थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेशाच्या ऑनलाइन रजिस्ट्रेशनला मुदतवाढ स्वेरीत ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा

पंढरपूरः शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (पदवी) च्या प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया सोमवारदि.१५ जुलै २०२४ पासून सुरु झाली आहे. या ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या प्रक्रियेला पुन्हा एकदा मुदतवाढ मिळाली असून आता ही प्रक्रिया  शनिवारदि.०४ ऑगस्ट २०२४ रोजी सायं. ५ वाजेपर्यंत चालणार आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयास  फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी. ६२२०) म्हणून मान्यताही मिळालेली आहे,’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.

         महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या https://cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली आहे. स्वेरी अभियांत्रिकी मध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ऑनलाईन (कॅप) रजिस्ट्रेशनची ही प्रक्रिया सोमवारदि.१५ जुलै २०२४ ते शनिवार दि.०४ ऑगस्ट २०२४ रोजी  सायं. ५ वाजेपर्यंत चालणार असून यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणेस्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करणेकागदपत्रांची पडताळणी करणे तर व्हेरीफिकेशन करण्यासाठी सोमवारदि.०५ ऑगस्ट २०२४ रोजी  सायं. ५ वाजेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. रजिस्ट्रेशन करण्यासासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवर्गानुसार असलेली सर्व मूळ कागदपत्रे सोबत आणावीत. थेट द्वितीय वर्ष रजिस्ट्रेशन साठीचे शुल्क खुला प्रवर्ग-१०००/- रु.आणि इतर प्रवर्ग-८००/- रु.असे आहे. रजिस्ट्रेशन फी ऑनलाईन भरण्यासाठी एटीएम किंवा रोख रक्कम आणावी. प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी व कन्फर्मेशन करण्यासाठी प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रियेच्या रजिस्ट्रेशनव्हेरीफिकेशन व कन्फर्मेशन प्रक्रियेनंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणेप्रथमद्वितीय व तृतीय अशा तीन फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरणे आदी प्रक्रिया होतील. थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (पदवी)च्या प्रवेशाचा लाभ डिप्लोमा (पदविका) इंजिनिअरिंग उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (पदवी)च्या प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा.करण पाटील (मोबा.नं.-९५९५९२११५४) व प्रा. पोपट आसबे (मोबा.नं.-७८२१००४६४७) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. प्रवेशासंदर्भातील प्रक्रियेत होणाऱ्या संभाव्य चुका टाळण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात येऊन आपला अर्ज भरावा व कन्फर्मेशन करून घ्यावे.’ असे आवाहन करण्यात आले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago