ताज्याघडामोडी

थेट द्वितीय वर्ष एमबीए प्रवेशासाठी ऑनलाइन कॅप रजिस्ट्रेशन प्रकियेस मुदतवाढ स्वेरीत ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध

पंढरपूरः शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता थेट द्वितीय वर्ष एमबीए (पदव्युत्तर पदवी) च्या प्रवेशासाठी ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेला मुदतवाढ मिळाली असून आता ही प्रकिया बुधवारदि.०७ ऑगस्ट २०२४ पर्यंत चालणार आहे.  राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून स्वेरी अभियांत्रिकीच्या एमबीए विभागास सुविधा केन्द्र  (एफ.सी. ६२२०) म्हणून मान्यताही मिळालेली आहे. ही ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया बुधवारदि.०७ ऑगस्ट २०२४सायं. ०५ वाजेपर्यंत चालणार आहे.‘ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.

         महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या https://cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली आहे. स्वेरी अभियांत्रिकीच्या एमबीए (पदव्युत्तर पदवी)  मध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ऑनलाईन (कॅप) रजिस्ट्रेशनची ही प्रक्रिया गुरुवारदि.२५ जुलै २०२४ ते बुधवारदि.०७ ऑगस्ट२०२४ रोजी सायं. ०५ वाजेपर्यंत चालणार असून यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणेस्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करणेकागदपत्रांची पडताळणी करणे आणि कन्फर्मेशन करणे आदी प्रक्रिया चालतील. यापूर्वी ही मुदत गुरुवारदि.२५ जुलै२०२४ ते गुरुवारदि.०२ ऑगस्ट२०२४ पर्यंत होती. यामध्ये ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणेकागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चिती आदी प्रक्रिया सुरू झाली होती पण या कालावधीत प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या अनेक विद्यार्थांना प्रशासनाकडून कागदपत्रे व प्रमाणपत्रे उपलब्ध झाली नाहीत. अथवा तांत्रिक बाबींच्या अडचणी निर्माण झाल्या. ही बाब लक्षात आल्यामुळे आता या प्रक्रियेला मुदतवाढ मिळाली असून विद्यार्थ्यांना आता रजिस्ट्रेशन प्रक्रिया बुधवारदि.०७ ऑगस्ट २०२४ रोजी सायं. ०५ वाजेपर्यंत तर कन्फर्मेशन प्रक्रिया गुरुवारदि.०८ ऑगस्ट २०२४ रोजी सायं. ०५ पर्यंत करता येणार आहे. रजिस्ट्रेशन करण्यासासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवर्गानुसार असलेली सर्व मूळ कागदपत्रे सोबत आणावीत. प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी व कन्फर्मेशन करण्यासाठी प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रियेच्या रजिस्ट्रेशन व कन्फर्मेशन नंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणेप्रथमद्वितीय व तृतीय अशा तीन फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरणे आदी प्रक्रिया होतील. थेट द्वितीय वर्ष एमबीए (पदव्युत्तर पदवी)च्या प्रवेशाचा लाभ बीटेकबीबीए व बीएमएस (चार वर्ष पदवी असलेल्या) या शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. थेट द्वितीय वर्ष एमबीए (पदव्युत्तर पदवी) च्या प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा.करण पाटील (मोबा.नं.-९५९५९२११५४) व प्रा. कोमल कोंडूभैरी (मोबा.नं.-८६३७७९६६९३) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. प्रवेशासंदर्भातील प्रक्रियेत होणाऱ्या संभाव्य चुका टाळण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात येऊन आपला अर्ज भरावा व कन्फर्मेशन करून घ्यावे.’ असे आवाहन करण्यात आले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago