पंढरपूर: प्रतिनिधी
शैक्षणिक वर्षे २०२४-२५ मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशाकरिता आवश्यक असणाऱ्या ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रिया राज्य सामाईक प्रवेश प्रक्रिया कक्ष मुंबई यांच्याकडून ३० जुलै २०२४ पर्यंत मुदत वाढत देण्यात आली असल्याची माहिती पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग काॅलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छित अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्र व प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध झाली नसल्याने प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदवी च्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेला शासनाकडून मुदतवाढ दिली असून सुधारीत वेळापत्रकानुसार मंगळवार दिनांक ३० जुलै २०२४ पर्यत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येणार आहे.
एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशनची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊ इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन करणे आवश्यक असते. प्रथम प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, स्कॅन केलेली मूळ कागदपत्रे अपलोड करणे आदी बाबींचा समावेश आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षेच्या विभागाकडून विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष अभियांत्रिकी रजिस्ट्रेशन दिनांक ३० जुलै २०२४ सायंकाळी ५ वा. पर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे. कागदपत्र व्हेरिफिकेशन ३१ जुलै २०२४ पर्यंत करता येणार आहेत.
तरी रजिस्ट्रेशन साठी येताना आपल्या प्रवर्गानुसार असलेली सर्व मूळ कागदपत्रे घेऊन यावीत तसेच सीईटी परीक्षेसाठी रजिस्टर केलेला मोबाइल नंबर सोबत असणे आवश्यक आहे.
अभियांत्रिकीच्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी प्रा. उमेश घोलप (८०५५१०३७१५), प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम (९४२३७४११५०) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग काॅलेजच्या वतीने करण्यात आले आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…