ताज्याघडामोडी

स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी घेतला ‘शिक्षण सर्वांसाठी, समृद्ध महाराष्ट्रासाठी’ या सत्राचा आनंद उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली शैक्षणिक माहिती

पंढरपूर– महाराष्ट्र राज्यातील पदवी व पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यासाठी राज्याच्या  उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे शिक्षण सर्वांसाठीसमृद्ध महाराष्ट्रासाठी‘ या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी विद्यार्थ्यांबरोबर थेट संवाद साधला. ना.पाटील यांनी आपल्या शैक्षणिक माहितीमधून उच्च व तंत्रशिक्षणाच्या नवीन योजना व धोरणासंबंधी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.

         स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवारअभियांत्रिकीच्या उपप्राचार्य डॉ.मिनाक्षी पवारबी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियारडिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळडी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवेविद्यार्थी अधिष्ठाता डॉ.महेश मठपती यांच्या नेतृत्वाखाली स्वेरीच्या अभियांत्रिकी (पदवी व पदविका) व फार्मसी (पदवी व पदविका) महाविद्यालयात या थेट प्रक्षेपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रत्येक वर्गात एल.सी.डी. प्रोजेक्टरद्वारे या उच्च व तंत्रशिक्षण संबंधीत कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचे आयोजन केले होते. स्वेरीच्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स हॉलट्रेनिंग अँड प्लेसमेंट हॉल तसेच इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रत्येक वर्गामध्ये हा कार्यक्रम थेट प्रक्षेपणाद्वारे पाहण्याची सोय करण्यात आली होती. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उच्चशिक्षण क्षेत्रातील प्रगतीनवनवीन अभ्यासक्रममुलींना मोफत शिक्षणस्वयं योजनास्पर्धा परीक्षाविद्यार्थ्यांसाठी  विविध कल्याणकारी योजना याबाबत सखोल माहिती दिली. त्यांच्या  समवेत शिक्षण मंडळाचे श्री. सावे यांनी देखील विविध योजनांची माहिती दिली. ना.पाटील यांनी जवळपास दीड तास केलेल्या मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली. अभियांत्रिकीच्या व फार्मसीच्या प्रथम वर्षापासून ते अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनीही  या थेट प्रक्षेपण कार्यक्रमाचा लाभ घेतला. विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे उच्चशिक्षणाविषयीचे विचार वर्गात बसून तन्मयतेने ऐकले. प्रवेशासाठी आलेले विद्यार्थी व पालकांना देखील या शैक्षणिक कार्यक्रमाचा लाभ घेता आला. ना. पाटील यांच्या महत्वाच्या विचारांमुळे स्वेरीच्या विद्यार्थ्यांच्या व  पालकांच्या ज्ञानात नक्कीच भर पडली. हा थेट प्रक्षेपणाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व अधिष्ठाताविभागप्रमुखप्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.  

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago