ताज्याघडामोडी

एमसीए प्रवेशासाठीच्या ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेस मुदतवाढ स्वेरीमध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा

पंढरपूर– ‘शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये एमसीए प्रवेशाकरिता आवश्यक असणाऱ्या ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेला राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षमुंबई यांच्या वतीने मुदतवाढ देण्यात आली आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.

       बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे व प्रमाणपत्रे वेळेत उपलब्ध न झाल्याने पदव्युत्तर पदवी असलेल्या एम.सी.ए.च्या ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेला शासनाने मुदतवाढ दिली असून सुधारित वेळापत्रकानुसार आता शनिवारदि.२७ जुलै २०२४ पर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे. प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी व निश्चिती (कन्फर्मेशन) करण्यासाठी रविवारदि.२८ जुलै २०२४ (सायं.५.००) पर्यंत मुदत दिली आहे. प्रवेशोत्सुक विद्यार्थ्याने एमएएच- एमसीए सीईटी २०२४ ही अथवा तत्सम परीक्षा दिलेली असावी. स्वेरीच्या एम.सी.ए. विभागाचे यंदाचे हे तिसरे वर्ष आहे. गेल्यावर्षी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी नोकरीसाठी विविध पदांवर रुजू देखील झाले आहेत. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली तज्ञ प्राध्यापक वर्गाच्या सहकार्याने ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची मोफत सुविधा स्वेरीमध्ये उपलब्ध आहे. या प्रक्रियेसंदर्भात अधिक माहीतीसाठी प्रवेश प्रक्रिया विभागाचे अधिष्ठाता प्रा. करण पाटील (मोबा. नंबर९५९५९२११५४) व एम.सी.ए.चे विभागप्रमुख प्रा. मनसब शेख (मोबा. नंबर– ९०२८९०७३६७) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago