सोलापूर – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने 6 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये विविध मागण्यांच्या संदर्भात आंदोलन करण्यात येणार आहे . या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठचे अध्यक्ष सुभाषराव माने यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर येथील मुख्याध्यापक भवन मध्ये बैठक संपन्न झाली .सदर बैठकीमध्ये संस्थाचालक, मुख्याध्यापक ,शिक्षक व शिक्षकेतर संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. १) शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना जाहीर करावी.
२) पवित्र पोर्टल मधील शिक्षक नियुक्ती ताबडतोब करावी ,अथवा संस्थेला शिक्षक नियुक्तीसाठी परवानगी द्यावी.
३) शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यता मिळाव्यात .
४)अल्पभाषिक व अल्पसंख्याक शाळातील रिक्त पदांची 100% शिक्षक भरती करण्याची परवानगी मिळावी.
५) प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेला टप्पा अनुदान प्रचलित नियमानुसार शाळेच्या वयाचा विचार करून शंभर टक्के जाहीर करावे.
६) वेतनेतर अनुदान सातव्या वेतन आयोगानुसार लगतच्या वर्षाच्या वेतन अनुदानावर मिळावे .
७)मार्च 2024 च्या सेवकसंच शासन निर्णयात दुरुस्ती करावी.
८) वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर भरतीसाठी परवानगी मिळावी.
९) मूल्यांकनात पात्र ठरलेल्या सर्व शाळा कॉलेजला अनुदान जाहीर करावे.
१०) अनुदानासाठी पात्र ठरणाऱ्या वरिष्ठ महाविद्यालयांना अनुदान जाहीर करावे
या मागण्या संदर्भात सहा ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता चार हुतात्मा पुतळा सोलापूर येथून जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद सोलापूर पर्यंत मोर्चा काढण्याचे ठरले. सहा ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व वरिष्ठ महाविद्यालय बंद ठेवून सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी ,मुख्याध्यापक, संस्थाचालक, पालक या सर्वांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन सोलापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष सुभाष माने यांनी केले .
सहा ऑगस्ट रोजी चे कामकाज रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी पूर्णवेळ शाळा, कॉलेज घेऊन भरून काढण्यात येईल अशी माहिती मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने यांनी दिली. या पुढील नियोजनाची बैठक सोमवार दिनांक 29 जुलै रोजी दुपारी बारा वाजता मुख्याध्यापक भवन येथे आयोजित केली जाणार आहे सदर बैठकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील संस्थाचालक व सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे असे आवाहन मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने यांनी केले.
सदर सहविचार सभेसाठी संस्था चालक संघटनेचे श्रीधर उन्हाळे, श्रावण बिराजदार, वैजिनाथ हत्तुरे, महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर, विनाअनुदानित कृती समितीचे संतोष गायकवाड ,शिक्षकेतर संघटनेचे शेजाळ सर, प्राथमिक शिक्षक संघटनेचे जयवंत हक्के , श्रीशैल कोळी सर,संतोष घोडके ,ज्यु कॉलेज संघटनेचे अध्यक्ष गवळी सर ,पंजाबराव देशमुख शिक्षक संघटनेचे अध्यक्ष जीवन यादव, सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघटनेचे रंगसिद्ध दसाडे, रेवनसिद्ध रोडगीकर, अंबादास चाबुकस्वार, लक्ष्मण चलगिरी, सोलापूर शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विद्यानंद स्वामी ,शेख सर, दादासो कोळी इत्यादी उपस्थित होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…