ताज्याघडामोडी

स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ संपन्न

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज  कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधील  मेकॅनिकल इंजिनिअरींग या विभागाच्या वतीने  आऊटकम-बेस्ड एज्युकेशन (ओबीई) अर्थात परिणाम-आधारित शिक्षण २०२४ मध्ये गुणवत्ता हमीसाठी औद्योगिक गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली’ या विषयावर एक आठवड्याचा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ संपन्न झाला.

       स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१९ जून २०२४ ते दि.२४ जून २०२४ दरम्यान अध्यापन आणि शिक्षण प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी आणि आऊटकम बेस्ड एज्युकेशन (ओबीई) च्या माध्यमातून शिक्षण गुणवत्ता वाढवण्यासाठी एक आठवड्याची ही  कार्यशाळा आयोजित केली होती. शैक्षणिक गुणवत्ता सुनिश्चित करणेजागतिक बाजारपेठेतील गरजा पूर्ण करणारे अभियंते तयार करणे आणि महाविद्यालयाच्या  सर्व घटकांना (विद्यार्थीपालकनियोक्तेसमाज) उत्कृष्ट शैक्षणिक सेवा पुरवणे हे या कार्यशाळेचे प्रमुख उद्देश होते. उच्च शिक्षणातील अध्यापन पद्धतींमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी ही कार्यशाळा महत्वाची ठरते. प्राध्यापकांना आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये प्रदान करूनविद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या बदलत्या गरजांना अधिक प्रतिसाद देणारे शैक्षणिक वातावरण निर्माण करणे हे देखील या कार्यशाळेचे उद्दिष्ट आहे. या कार्यशाळेत सहभागी प्राध्यापकांनी ओबीई’ च्या तत्त्वांबाबत सखोल चर्चा करून शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक बाबींची सांगोपांग चर्चा केली. या कार्यशाळेत  विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. वाढलामुडी, (गुंटुर-आंध्रप्रदेश) मधील विग्नान्स लारा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स च्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाचे डॉ. राधा कृष्ण गोपिडेसी यांनी पारंपरिक शिक्षण मॉडेल्सपासून ओबीई कसे वेगळे आहे हे स्पष्ट केले. स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगपंढरपूरचे डॉ. नितीन कौटकर यांनी शिक्षणातील डिजिटल साधनांची ओळख करून दिली ज्यामध्ये लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम्स (एलएमएस)इंटरॅक्टिव्ह सॉफ्टवेअर आणि ऑनलाइन संसाधने या बाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. स्वेरीचेच डॉ. पी. आर. कुलकर्णी यांनी आउटकम बेस्ड अभ्यासक्रम विकसित करण्याच्या प्रक्रियेत शिक्षण उद्दिष्टे सेट करणेअभ्यासक्रम सामग्रीचे या उद्दिष्टांसह मॅपिंग करणे आणि आयएसओ-९००० सारख्या उद्योग मानांकनासह संरेखन सुनिश्चित करणे आदीबाबत माहिती दिली. स्वेरीच्या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या मुख्य समन्वयिका प्रा. मिनल भोरे यांनी ओबीई  संदर्भात टोटल क्वालिटी मॅनेजमेंट (टीक्युएम) ची गरज सांगून टीक्युएमची अंमलबजावणी केल्यास नक्कीच गुणवत्तापूर्ण शिक्षण सुधारण्यास मदत होईलजे फक्त विद्यार्थ्यांच्या समाधानासाठी नाही तर सर्व हितधारकांच्या समाधानासाठीही महत्त्वाचे आहे.’ असे सांगितले. छत्रपती संभाजीनगर एमआयटीचे डॉ. सी. डी. कुटे यांनी कोर्स आऊटकम (सीओ) आणि प्रोग्राम आऊटकम (पीओ) साध्य करण्यासाठी लक्ष्य कसे सेट करावे तसेच त्याची विविध सूत्रे आणि सीओ आणि पीओ मॅपिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या नात्यांचे स्पष्टीकरण केले. उपस्थित प्राध्यापकांनी विविध साधनांची आणि वेगवेगळ्या बाबींची  माहिती दिली. ही कार्यशाळा यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी विभागप्रमुख डॉ. श्रीकृष्ण भोसले यांच्या नेतृत्वाखाली प्रा.सुशील साठे व डॉ. नितिन कौटकर यांनी समन्वयक म्हणून तर डॉ. हर्षवर्धन रोंगे व प्रा. दिगंबर काशिद आणि यांनी सह-समन्वयक म्हणून काम पाहिले. कार्यशाळेला अभियांत्रिकीच्या विविध संस्थांमधून सुमारे ३५० पेक्षा जास्त प्राध्यापक उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago