पंढरपूर /प्रतिनिधी
मोहोळ विधानसभा मतदार संघांचे उमेदवार उद्योजक राजू खरे यांनी राज्याचे गतिमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्री स्व. गंगुबाई संभाजी शिंदे यांचे स्मरणार्थ आषाढी वारीतील भाविकांना मोफत अन्नछत्र उघडले होते . याचे उदघाटन शिवसेनेचे मुख्य पक्षप्रतोद आ. भरतशेठ गोगावले यांचे हस्ते करण्यात आले. आषाढी एकादशी दिवशी दिवसभर मोफत फराळाचे वाटप करण्यात आले. दुसऱ्या दिवशी भोजन देण्यात आले.याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला आहे. खरे यांचेकडून अनेक उपक्रमाचे माध्यमातून अनेकांना मदत करण्याचा त्यांचा नेहमीचाच पायंडा आहे. त्यातून पांढरीत वारीसाठी आलेल्या लोकांना मोफत भोजन देण्यासाठी या वारीत देण्यात आले. गोपाळपूर पासून जवळ असलेल्या दर्शन रांगेलगत हे अन्नदान करण्यात आले आहे. गोपाळपूर येथील जनाबाईचे दर्शन घेऊन ये जा करणाऱ्या भाविकांना या अन्नछत्राचा लाभ घेता आला आहे. यासाठी मागील दोन दिवसापासून राजू खरे यांचे अनेक कार्यकर्ते परिश्रम घेत होते . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आषाढी वारी नियोजन पाहण्याचा दौरा रविवारी होता. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री यांनी राजू खरे यांनी उघडलेल्या या अन्नछत्रचे जवळपास आले होते.
यावेळी राजू खरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत केले होते. हे अन्नदान खरे परिवाराचे वतीने करण्यात आले. त्यामुळे याठिकाणी स्वतः राजू खरे, त्यांच्या पत्नी सौं तृप्तीताई खरे, बंधू विजय खरे, कु.अवंती खरे, कु.अबोली खरे, मारुती खरे, सौं राखी खरे, गोपाळपूर सरपंच अरुण बनसोडे, नेपातगाव सरपंच पांडुरंग परकाळे, रामहिंगणी सरपंच संभाजी लेंगरे, पाटुकुल उपसरपंच गणेश नामदे, समाधान यादव, आंबेचे माजी सरपंच प्रकाश माळी, लक्षमन गायकवाड, माऊली कोळी,नोमिनाथ सिरसट, लखन वाघमारे, निखिल गायकवाड, अतिश सावंत, सिद्धू चव्हाण, सुभाष बनसोडे,राहुल जावळे,सौं जोती जावळे,सिद्धार्थ लोखंडे पाटील,संजय मस्के,रणजित गळीतकर,शिवसेना उत्तर सोलापूर प्रमुख उमाकांत करंडे,कैलास कोरडे,
यांचेसह राजू खरे परिवार यांचेसह समर्थक यांनी परिश्रम घेतले .
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…