नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून एका वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. मात्र, अद्याप खरी राष्ट्रवादी कोणाची यावर सर्वोच्च निकाल आलेला नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने बहुमताच्या जोरावर अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मूळ नाव आणि ‘घड्याळ’ हे चिन्ह बहाल केलं. तर शरद पवार गटाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह देण्यात आलं. मात्र, शरद पवार गटाने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आज या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने अजित पवार गटाला काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
सुप्रीम कोर्टाकडून अजित पवार गटाला दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच अजित पवारांच्या उत्तरावर जर शरद पवार यांना प्रतिवाद सादर करायचा असेल तर एका आठवड्यात शरद पवारांनी तो दाखल करावा, असेही कोर्टाने म्हटले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑगस्टला होणार आहे. त्यामुळे पुढील सुनावण्यांमध्ये सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…