ताज्याघडामोडी

आषाढी वारीत वारकऱ्यांची तहान भागवत आहेत स्वेरीचे विद्यार्थी राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते पाणी वाटप कार्याचे उदघाटन

पंढरपूरः श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी आतूर झालेल्या वारकऱ्यांची तहान दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वेरीचे विद्यार्थी भागवीत आहेत. राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्तेपुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य राजेश पांडेमोहन डांगरेस्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. या पाणी वाटपाच्या उपक्रमात श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित असलेल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (डिग्री)कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (डिप्लोमा)डी.फार्मसी व बी.फार्मसी या चारही महाविद्यालयातील प्राचार्यउपप्राचार्यअधिष्ठाताविभागप्रमुखप्राध्यापक व विद्यार्थी असे मिळून जवळपास १०० जण सहभागी झाले आहेत.  

         राज्यात तंत्रशिक्षणातून विशेष ओळख निर्माण करणाऱ्या स्वेरी‘ या संस्थेमार्फतसंस्थेच्या स्थापनेपासून अर्थात १९९८ पासून विविध समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत. दिंडीतील वारकऱ्यांचा सहभाग  पाहता यंदा वारीत वारकऱ्यांची गर्दी अधिक होण्याची चिन्हे दिसत आहेत. परंपरेप्रमाणे दर्शन रांगेतील वारकऱ्यांना आर.ओ. फिल्टर्ड पिण्याचे पाणी वाटपाचे कार्य काल सोमवार (दि.१५ जुलै) पासून सुरु झाले. वारकऱ्यांच्या उपस्थितीत रिद्धी सिद्धी गणपती मंदिरालगत असणाऱ्या पत्राशेड मधील दर्शन मंडप रांगेतील वारकऱ्यांना पिण्याचे  शुद्ध पाणी देवून या पाणी वाटपाच्या उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. सकाळी ८ ते सायंकाळी ८ या वेळेत गोपाळपूररिध्दी-सिध्दी मंदिर व दर्शन बारीपत्रा शेड या ठिकाणी विद्यार्थी वारकऱ्यांना प्रचंड उत्साहाने आर.ओ. फिल्टर्ड पाण्याचे वाटप करत आहेत. नवमीदशमी व एकादशी या तीनही दिवशी विद्यार्थी ग्लासवॉटर जग आणि वॉटर टॅंकद्वारे पाणी वारकऱ्यांपर्यंत पोहचवून वारकऱ्यांची तहान भागवत आहेत. स्वेरीकडून दररोज साधारण आठ ते दहा हजार लिटर पाण्याचे वाटप केले जात आहे. या उपक्रमाच्या उदघाटनावेळी माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणाले की, ‘स्वेरीचे विद्यार्थी हे अभ्यासक्रमात अग्रेसर आहेतच पण आता  त्यांच्या हातून समाजकार्य ही उत्तम घडत आहे’ असे म्हणून स्वेरीच्या समाजकार्याचे कौतुक केले. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवार यांच्या सहकार्यानेडिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळविद्यार्थी अधिष्ठाता डॉ. एम.एस.मठपतीप्रा. ए.एस.भातलवंडेप्रा. पी.एस.वलटेरा.से.योजनेचे प्रा. आर.एस. साठेडॉ.डी.एस. चौधरीसमन्वयक प्रा. एन.ए.शिंदे, ‘कमवा व शिकाचे प्रा. ए.ए.पवारविभागप्रमुख प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी वारकऱ्यांना पाणी वाटपाचे कार्य मनोभावे करत आहेत. कॉलेजमधून इतर सहकारी पाणी आणून दर्शन रांगेजवळ असलेल्या टाक्यात साठवतात. त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना’ व कमवा व शिका’ योजनेतील विद्यार्थी मोठ्या उत्साहाने वारकऱ्यांना पाणी वाटप करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रत्येक दिवशी २० प्राध्यापक व जवळपास १०० विद्यार्थी दिवसभर मोफत शुद्ध पाणी वाटप करत आहेत. प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर यांनी या उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

राष्ट्रवादी कॉग्रेस (श.प.) पक्षाच्या अल्पसंख्यांक विभाग जिल्हा उपाध्यक्षपदी गुलाब मुलाणी यांची निवड  खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याहस्ते निवडीचे पत्र प्रदान

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्याक विभाग जिल्हा उपाध्यक्षपदी पंढरपुर तालुक्यातील कोर्टी येथील गुलाब मुलाणी यांची…

10 hours ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्ष सोलापूर जिल्हा ओबीसी विभाग कार्यकारिणी बरखास्त

नवीन कार्यकारणीसाठी मुलाखत घेऊन निवडी करणार - अरुण तोडकर  राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्ष सोलापूर…

19 hours ago

‘अभियंता दिना’ निमित्त स्वेरीत रक्तदान शिबीर संपन्न राष्ट्रीय सेवा योजनेचा उपक्रम

पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर (ऑटोनॉमस) व सोलापूर विद्यापीठ संलग्नित असलेल्या…

2 days ago

अभियंत्यांचे जनक -सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील चिक्कबळ्ळापूर तालुक्यातील मुद्देनहळ्ळी या गावी १५ सप्टेंबर १८६०…

4 days ago

स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीची ‘न्यु लाईफ फार्मा’ या कंपनीला औद्योगिक भेट

पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी मधील…

5 days ago

‘राष्ट्रीय क्रीडा दिना’निमित्त स्वेरीत बुद्धिबळ आणि बॅडमिंटन स्पर्धा संपन्न

पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय…

6 days ago