ताज्याघडामोडी

प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेशासाठी ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रिया दि.१४ जुलै पासुन सुरु स्वेरीत ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध

पंढरपूरः ‘प्रथम वर्ष इंजिनिअरिंग (पदवी) च्या प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया रविवार, दि.१४ जुलै २०२४ पासून सुरु झाली  असून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी. ६२२०) म्हणून मान्यताही मिळालेली आहे. ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया बुधवार, दि.२४ जुलै २०२४ (सायं. ५.००) पर्यंत चालणार आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी दिली.
       महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या https://cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या नियोजनात्मक मार्गदर्शनाखाली स्वेरी अभियांत्रिकी मध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशनची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, मूळ कागदपत्रे अपलोड करणे आदी बाबींचा समावेश आहे. पदवी अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठीची ही प्रक्रिया दि.१४ जुलै २०२४ पासून ते दि.२४ जुलै २०२४ (सायं.५.०० वा.) पर्यंत चालेल तर कागदपत्रे पडताळणी करून खात्री करणे यासाठी दि. १४ जुलै २०२४ पासून गुरुवार, दि. २५ जुलै २०२४ (सायं.५.०० वा.) पर्यंत मुदत दिली आहे. रजिस्ट्रेशनसाठी येताना विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवर्गानुसार असलेली सर्व मूळ कागदपत्रे घेऊन यावीत तसेच स्वतःचा  मोबाइल/नंबर सोबत असावा. ‘सदरची नोंदणी यशस्वीपणे आणि बिनचूकपणे केलेले विद्यार्थीच शासनाच्या कॅप राऊंडसाठी पात्र राहतील. सदर कॅप राऊंड मधून प्रवेशित विद्यार्थीच  शासनाच्या वेगवेगळ्या सवलती घेण्यास पात्र राहतील. त्यामुळे ही प्रवेश नोंदणी प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असून सर्व विद्यार्थी व पालकांनी स्वेरीत येऊन ही प्रक्रिया येथील तज्ञ शिक्षकांमार्फत पूर्ण करून घ्यावी.’ असे आवाहन प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा.करण पाटील यांनी केले आहे. अभियांत्रिकीच्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी अधिष्ठाता प्रा.करण पाटील (९५९५९२११५४) व प्रा. यु.एल.अनुसे (९१६८६५५३६५) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

अभियंत्यांचे जनक -सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील चिक्कबळ्ळापूर तालुक्यातील मुद्देनहळ्ळी या गावी १५ सप्टेंबर १८६०…

1 day ago

स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीची ‘न्यु लाईफ फार्मा’ या कंपनीला औद्योगिक भेट

पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी मधील…

3 days ago

‘राष्ट्रीय क्रीडा दिना’निमित्त स्वेरीत बुद्धिबळ आणि बॅडमिंटन स्पर्धा संपन्न

पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय…

4 days ago

दयानंद कॉलेज, सोलापूर आणि स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्यात सामंजस्य करार ड्रोन तंत्रज्ञान संशोधनाला मिळणार गती

पंढरपूर- ‘सोलापूर मधील डी.बी.एफ. दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स आणि गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील श्री.…

5 days ago

स्वेरीत ‘ऑलम्पस २ के २४’ या तंत्रस्पर्धेच्या पोस्टरचे उदघाटन येत्या दि. १५ व १६ सप्टेंबर रोजी स्वेरीत ‘ऑलम्पस २ के २४’ या तांत्रिक स्पर्धेचे आयोजन

पंढरपूर– स्वेरीत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे सुप्त गुण व कौशल्ये सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारे विविध…

6 days ago

स्वेरीचे सामाजिक कार्य कौतुकास्पद -अधिक्षिका श्रीमती राजश्री गाडे स्वेरीतर्फे नवरंगे बालकाश्रमाला पाणी शुद्धीकरण यंत्र भेट

पंढरपूर –‘विशेष करून ग्रामीण भागात ‘स्वेरी’ ही शिक्षणसंस्था शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबरोबरच सामाजिक कार्यात देखील सातत्याने सहभाग घेवून स्तुत्य…

1 week ago