कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागामध्ये प्रथम वर्षातून द्वितीय वर्षांत पदार्पण केलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. सुभाष पिंगळे यांनी स्वागत समारंभ प्रसंगी दुसऱ्या वर्षाच्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांना सर्वप्रथम मिशन बद्दल माहिती दिली. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागात कार्यरत असलेल्या ॲसेस बद्दल बोलताना त्यांनी विविध उपक्रमाबद्दल महत्वपूर्ण माहिती दिली. विविध उपक्रमांचा उपयोग करून घेण्याचे आव्हान या दरम्यान विभाग प्रमुख डॉ. सुभाष पिंगळे यांनी या दरम्यान विद्यार्थ्यांना केले. तसेच विभागातील प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. त्याच पद्धतीने विभागात होत असलेल्या इंडस्ट्रियल व्हिजिट व ट्रेनिंग प्रोग्राम याबद्दल माहिती देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील प्रा. उदयकुमार फुले यांचे सहकार्य लाभले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…