ताज्याघडामोडी

स्वेरीच्या प्रा.बी.डी. गायकवाड व प्रा. एस.एम. खोमणे यांच्या पेटंटला भारत सरकार कडुन मान्यता ‘कन्वेअर चेन लिंक मॅन्युफॅक्चरिंग’ यावर केले संशोधन

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाअंतर्गत असलेल्या वर्कशॉपचे इन्चार्ज प्रा.भास्कर धोंडी गायकवाड व प्रा. सचिन महादेव खोमणे यांच्या पेटेंटला भारत सरकारकडून नुकतीच मान्यता मिळाली आहे.

स्पेशल पर्पज टूल बाय कंबायनींग टू कटिंग ऑपरेशन इन अ सिंगल स्ट्रोक ऑफ प्रेस मशीन टू मॅन्युफॅक्चरिंग कन्वेअर लिंक’ या विषयावर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वर्कशॉपचे इन्चार्ज प्रा.भास्कर गायकवाड व प्रा. सचिन खोमणे यांनी या शोध पेटंटची निर्मिती केली आहे. साखर कारखान्यातील अवजड मशीन्समध्ये असलेल्या कन्वेअर चेन लिंक मॅन्युफॅक्चरिंगसाठी याचा उपयोग होतो. स्वेरीचे प्रा.बी.डी. गायकवाड व प्रा. सचिन खोमणे यांच्या या  पेटंटला भारत सरकार कडुन मान्यता मिळाल्याबद्धल संस्थेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सर्व मान्यवरअधिष्ठाताविभागप्रमुख व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. संशोधन विभागाच्या प्रगतीचे द्योतक असणाऱ्या या  पेटंट मुळे स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगेसंस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगेउपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारीस्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवारस्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्यअभियांत्रिकीच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवारअधिष्ठातासर्व विभागप्रमुखप्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारीविद्यार्थी व पालकांनी वर्कशॉपचे इन्चार्ज प्रा.भास्कर गायकवाड व प्रा सचिन खोमणे यांचे अभिनंदन केले. 

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago