ताज्याघडामोडी

मंगळवेढा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत व निवासस्थान बांधकामास 99 कोटीचा निधी मंजूर

मंगळवेढा येथे तीस खाटाच्या ग्रामीण रुग्णालयाचे 100 खाटांचा उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याच्या मागणीची शासनाने दखल घेऊन शंभर खाटांचा उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीसाठी व कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी 99 कोटी आठ लाख रुपयाचा अंदाजपत्रक व आराखड्यास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून लवकरच हे काम सुरू होणार असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली.

मंगळवेढा शहर व तालुक्यातील रुग्णांची वाढती संख्या व तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सक्षमीकरण होण्याच्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच आरोग्यमंत्री ना.प्रा.डॉ.तानाजी सावंत यांचेकडे सदर रुग्णालयाच्या वाढीव खाट क्षमतेसाठी पाठपुरावा व पत्रव्यवहार करुन ही मागणी केली होती. या वाढीव खाटांच्या भौतिक सुविधेमध्ये निरनिराळ्या आजारांवरील १४ तज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित नर्स, इतर कर्मचाऱ्यांचा असा एकूण ३९ नवीन कर्मचारी स्टाफ, सुसज्ज्य आय. सी. यु., ऑपरेशन थिएटर, आदी जिल्हा रुग्णालय पातळीवरील असणाऱ्या सोयी या उपजिल्हा रुग्णालयात मिळणार आहेत.

तालुका आरोग्य विभागाच्या मार्गदर्शन व देखरेखखाली अनेक मातांच्या प्रसूती, निरनिराळ्या छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया यासाठी दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांना खाट उपलब्ध न झाल्याने तासनतास उपचारासाठी ताटकळत आणि वेदना सहन करत प्रतिक्षा करावी लागत होती,परंतु हे रुग्णालय उभारल्यानंतर वाढीव खाट मागणीच्या पूर्ततेमुळे रुग्णांच्या आरोग्य उपचार अडी-अडचणी व समस्या यांना आता पूर्णविराम मिळणार आहे. \

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 hour ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago