.सी.ए. प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरूवात
कासेगावच्या इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट स्टडीज (आय.सी.एम.एस) मध्ये मोफत सुविधा उपलब्ध
पंढरपूरः ‘कासेगाव (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट स्टडीज या महाविद्यालयामध्ये बी.सी.ए प्रथम वर्ष प्रवेशासाठी सीईटीच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरूवात झालेली आहे. सदर ऑनलाईन प्रक्रिया ही शनिवार, दि.२९ जून, २०२४ पासून बुधवार, दि.३ जुलै, २०२४ पर्यंत चालणार आहे.’ अशी माहिती महाविद्यालयाच्या कॅम्पस प्रमुख डॉ.जयश्री भोसले यांनी दिली.
सन २०२४-२५ करीता बी.सी.ए. प्रथम वर्ष या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी सीईटी परीक्षा देणे आवश्यक आहे. सदर सीईटी परीक्षेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरूवात झालेली आहे. पंढरपूर पंचक्रोशीतील व ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांना बी.सी.ए. प्रथम वर्ष प्रवेशाच्या अनुषंगाने सीईटी साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया मार्गदर्शन, पालकांचा होणारा संभ्रम, संबंधीत कागदपत्रे जमविताना होणारी अडचण व शंका याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सुविधा केंद्र सुरु केले असून यंदाचे हे बी.सी.ए. चे १६ वे वर्ष आहे. आय.सी.एम.एस महाविद्यालयाने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. ही प्रकिया शनिवार, दि.२९ जून, २०२४ पासून बुधवार, दि.३ जुलै, २०२४ पर्यंत चालणार आहे. याचा लाभ बारावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी घेण्याचे आवाहन केले आहे. या कालावधीत प्रमाणपत्रांची पडताळणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रियेनंतर मुख्य कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया चालू होणार आहे. बी.सी.ए. या अभ्यासक्रमासाठी सीईटीची ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया व प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी कॅम्पस प्रमुख डॉ. जयश्री भोसले (मोबा.क्र.७७६८००८९८८),श्री. राजकुमार वाघमारे (मोबा.क्र.९७३००७१३११), प्रा.एम.व्ही.चौगुले (मोबा.क्र.९९६०३९३८३६) व प्रा.सौ.के.एस.नलवडे (मोबा.क्र.७८२१८५७१७३) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. ए.एस.माने यांनी केले आहे. संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली बी.सी.ए. या अभ्यासक्रमाच्या फॅसिलिटेशन सेंटरमध्ये सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून येत आहे.