ताज्याघडामोडी

स्वेरीच्या डॉ. मोहन ठाकरे यांना केंद्रीय ऊर्जा विभागाकडून संशोधन पुरस्कार प्राप्त

पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. मोहन  पुरुषोत्तम ठाकरे यांना विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट संशोधनाबद्दल दिल्ली येथील केंद्रीय ऊर्जा मंत्रालया अंतर्गत असलेल्या विद्युत विभागाच्या वतीने प्रतिष्ठेचा संशोधन पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार ३८ व्या भारतीय अभियांत्रिकी संमेलनाच्या जबलपूर (मध्य प्रदेश) मधील हॉटेल रॉयल ऑर्बिट मध्ये झालेल्या पारितोषिक वितरण समारंभामध्ये प्रदान करण्यात आला.

         स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या  डॉ. ठाकरे यांच्या इंटरलाइन पॉवर फ्लो कंट्रोलर (आयपीएफसी)’ दीर्घ प्रसारण लाईन्समध्ये तैनात करणे आणि त्याचा डिस्टन्स रिलेसवर होणारा परिणाम’ या शीर्षकाच्या पुरस्कार विजेत्या पेपरला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली आहे. त्यांच्या या संशोधनाने विद्युत अभियांत्रिकी क्षेत्राला मौल्यवान योगदान प्राप्त झाले आहे. या सन्मानामुळे डॉ. ठाकरे यांचे कार्य इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग क्षेत्रात  विशेष लक्षवेधी ठरले आहे. या पुरस्काराने  स्वेरीच्या संशोधन आणि विकास कार्यास बळकटी मिळाली आहे. डॉ. मोहन पी. ठाकरे यांनी विविध प्रतिष्ठित जर्नल्स आणि परिषदांमध्ये एस.सी.आय. आणि स्कोपस इंडेक्स जर्नल्स मध्ये १२१ संशोधन पेपर्स प्रकाशित केले आहेत. त्यांची गुगल स्कॉलर संदर्भ संख्या ८९० आणि एच-इंडेक्स १७ आहे. गत वर्षात डॉ. ठाकरे यांनी प्रतिष्ठित जर्नल्समध्ये जवळपास आठ स्कोपस-इंडेक्स केलेले जर्नल पेपर्स प्रकाशित करून विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या वर्षातचडॉ. ठाकरे यांनी स्मार्ट ग्रीड तंत्रज्ञानबॅटरी व्यवस्थापनासह इलेक्ट्रिक वाहनेफॅकट्स तंत्रज्ञानमशीन ड्राईव्जएसी ट्रान्समिशन लाईन्स प्रोटेक्शन आणि एचव्हीडीसी ट्रान्समिशन लाईन्स यावर लक्ष केंद्रित करणारे १३ संशोधन पेपर्स प्रकाशित केले आहेत.डॉ. ठाकरे यांनी दोन अटल फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम्स (एफडीपी) आयोजित करण्यासाठी रु.७ लाखांचा निधी एआयसीटीई कडुन प्राप्त केला आहे. या निमित्ताने संस्थेतर्फे डॉ. ठाकरे यांचा  सत्कार करण्यात आला. यावेळी स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रातील या उल्लेखनीय कामगिरीसाठी आणि महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल डॉ. मोहन ठाकरे यांचे स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगेसंस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगेउपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारीपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठसोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवारस्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवारउपप्राचार्य डॉ. मिनाक्षी पवारबी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम. जी. मणियारडिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळडी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. एस.व्ही.मांडवेसर्व अधिष्ठातासर्व विभागप्रमुखप्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारीविद्यार्थी यांनी अभिनंदन केले.  

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 hour ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago