ताज्याघडामोडी

प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठीच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेला मुदतवाढ स्वेरी पॉलिटेक्निकमध्ये मोफत सुविधा केंद्र

पंढरपूरः- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.) क्र.- ६४३७ ला मान्यता मिळाली असून प्रथम वर्ष डिप्लोमा प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याच्या प्रक्रियेला आता मुदतवाढ मिळाली आहे. बुधवार दि. २९ मे२०२४ पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणेकागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चिती आदी प्रक्रिया सुरू झाली होती आणि मंगळवार दि. २५ जून २०२४ ला संपणार होती पण दरम्यानच्या कालावधीत अनेक विद्यार्थांना प्रशासनाकडून कागदपत्रे व प्रमाणपत्रे उपलब्ध झाली नाहीत. ही बाब लक्षात आल्यामुळे आता या प्रक्रियेला मुदतवाढ मिळाली असून विद्यार्थ्यांना आता दि. ०९ जुलै२०२४ पर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे. आता विद्यार्थांना  रजिस्ट्रेशन करण्यासाठी फक्त त्यांचा दहावी परीक्षेचा आसन क्रमांक टाकून प्रवेश अर्ज भरता येणार आहे.‘ अशी माहिती डिप्लोमा प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांनी दिली.

          शै. वर्ष २०२४-२५ मध्ये प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग  प्रवेशाकरीता ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणेभरलेले अर्ज स्विकारुन प्रमाणपत्रेकागदपत्रांची तपासणीछाननी व नोंदणी आदी प्रक्रिया करण्याकरिता मुंबई येथील मा. संचालकतंत्रशिक्षण संचालनालयमहाराष्ट्र राज्य (डी.टी.ई) यांनी अधिकृत केंद्र (एफ.सी. क्र.-६४३७) म्हणून मान्यता दिली आहे. पंढरपूर पंचक्रोशीतील व ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शनपालकांचा होणारा संभ्रमसंबंधीत कागदपत्रे जमविताना होणाऱ्या अडचणी व शंका याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सुविधा केंद्र सुरु केले असून यंदाचे स्वेरी डिप्लोमा इंजिनिअरिंगचे १६ वे वर्ष असून उज्ज्वल यशाची परंपरा या महाविद्यालयाने कायम राखली आहे. ही प्रकिया दि. २९ मे२०२४ पासून ते दि. ०९ जुलै२०२४ सायं. ५ वाजेपर्यंत चालणार आहे. या सुविधेचा लाभ दहावी मधून उत्तीर्ण झालेले विद्यार्थीज्यांनी अजून रजिस्ट्रेशन केले नाही असे विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी घ्यावा असे आवाहन केले आहे. दरम्यान या कालावधीत प्रमाणपत्रांची पडताळणीछाननी व नोंदणी आदी प्रक्रियेनंतर मुख्य कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया चालू होणार आहे. डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी प्रा.एस.एस.गायकवाड (मोबा.क्र.-९८९०५६६२८१) व प्रा.एम.एम.मोरे (मोबा.क्र. -९४२१९६०२५८) यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली उच्चशिक्षित प्राध्यापकांच्या सहकार्याने सर्वोत्कृष्ट निकालआदर युक्त शिस्त आणि करिअरच्या दृष्टीने सर्वोत्तम संस्कार देण्याची परंपरा कायम राखल्यामुळे स्वेरीच्या पंढरपूर पॅटर्न’ चा दबदबा कायम आहे. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे ५ अभ्यासक्रमांना मिळालेले एनबीए मानांकनमहाराष्ट्र व गोवा राज्यातील बेस्ट पॉलिटेक्निक कॅम्पस अवॉर्डगेली सलग सहा  वर्षे शंभर टक्के ऍडमिशन होणारे महाराष्ट्रातील बहुधा एकमेव खाजगी महाविद्यालय आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांच्या पसंतीस उतरलेले स्वेरी अभियांत्रिकी हे राज्यात ब्रँड’ बनले आहे. त्यामुळे स्वेरीत प्रवेशासाठी प्रचंड गर्दी होत आहे. या वर्षीही विद्यार्थी व पालक यांचेकडून स्वेरी डिप्लोमालाच प्रथम पसंती व उस्फूर्त  प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. सन २०२४-२५ करीता प्रवेशासाठी स्वेरी संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग फॅसिलिटेशन सेंटरमध्ये सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून येत आहे.

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago