Categories: Uncategorized

स्वेरीतील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना निरोप

पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विभागातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना नुकताच निरोप देण्यात आला. त्यानिमित्त निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. स्वेरीमध्ये चार वर्षे परिश्रम केल्यामुळे आणि गुरु-शिष्याचे एक वेगळे बंधन जपल्यामुळे कॉलेज सोडताना विद्यार्थी भावनिक झाले होते.

      स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व विभागप्रमुख डॉ.डी.ए.तंबोळी यांच्या नेतृत्वाखाली हा समारंभ संपन्न झाला. दीप प्रज्वलनानंतर विभागप्रमुख डॉ.डी.ए.तंबोळी यांनी विद्यार्थ्यांना करिअरसाठी व भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा. एस.एम.खोमणे व शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. एम.पी.ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील जबाबदारीची जाणीव करून यशाचे कानमंत्र देताना भारताचे जबाबदार नागरिक होत असताना जनसेवा करावी.’ असे सांगितले. तसेच यावेळी प्रा.डी.डी.डफळेप्रा. व्ही. जे. पाटीलप्रा. एस.एस.कवडेप्रा.एम.के.पवारप्रा. व्ही. ए. सावंतप्रा. एस. बी. खडके यांनी देखील मार्गदर्शन केले.  स्वेरीमध्ये चार वर्ष शिक्षण घेतल्यानंतर समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि चार वर्षातील आपले अनुभव सादर केले. यामध्ये श्रेया शिंदोलसार्थक लोखंडे यांच्यासह इतर विद्यार्थ्यांनी चार वर्षांच्या काळात संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक वर्गांनी आमच्याकडून अभ्यास कसा करवून घेतलापरिश्रमाद्वारे अभ्यासात सातत्य ठेवण्याबाबत तसेच प्राध्यापकांनी आम्हाला चुकीच्या वेळी दिलेली शिक्षात्यातून मिळालेले अनमोल शिक्षण यातून आमच्या करिअरसाठी तयार झालेली परिपक्वता आणि संस्कारित प्रतिमा या विषयी विद्यार्थ्यांनी अतिशय हृदयस्पर्शी असे अनुभव सांगितले. यावेळी आठवण म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांना स्वेरीतर्फे भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधील सर्व विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. प्रा.आर. एन. खांडेभरड यांनी सूत्रसंचालन केले तर समन्वयक प्रा.डी.डी.डफळे  यांनी आभार मानले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

3 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

3 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago