Categories: Uncategorized

स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ‘ओबीई रँकिंग्ज २०२४ मध्ये उत्कृष्टतेचा सन्मान डायमंड बँड: इन्स्टिट्यूशन ऑफ प्रॉमिनन्स श्रेणीचे मानांकन

पंढरपूर: गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ‘ओबीई रँकिंग्ज २०२४’ मध्ये उत्कृष्टतेचा सन्मान प्राप्त झाला आहे. यामुळे स्वेरीला ‘डायमंड बँड: इन्स्टिट्यूशन ऑफ प्रॉमिनन्स’ या श्रेणीचे मानांकन मिळाले आहे.
    आऊटकम-बेस्ड एज्युकेशन (ओबीई) क्षेत्रात उत्कृष्टता साध्य केल्याबद्दल हा सन्मान स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला देण्यात आला आहे.  सदरचे मानांकन हे ‘आर वर्ल्ड इन्स्टिट्युशनल रँकिंग’ यांच्याकडून प्रदान करण्यात आले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पंढरपूर पॅटर्न’च्या माध्यमातून स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ‘शैक्षणिक क्रांती’ होत आहे. या सन्मानामुळे स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या शैक्षणिक व व्यवस्थापकीय कार्यक्षमतेला एक नवी ओळख मिळाली आहे  तसेच आऊटकम-बेस्ड एज्युकेशन साठी केलेल्या प्रयत्नांची पावती देखील मिळाली आहे. भारतात अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये असताना केवळ तंत्रशिक्षणाचा निकष लावून स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ‘डायमंड बँड: इन्स्टिट्यूशन ऑफ प्रॉमिनन्स’ या श्रेणीत मानांकन प्रदान करण्यात आले आहे. गेल्या महिन्यामध्ये ‘आर वर्ल्ड इन्स्टिट्युशनल रँकिंग’ यांनी ‘ओबीई रँकिंग्ज २०२४’ साठी संपूर्ण देशभरातून प्रस्ताव मागवले होते. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.मिनाक्षी पवार यांच्या नियोजनात्मक मार्गदर्शनाखाली आय.क्यू.ए.सी.चे समन्वयक डॉ. संदीप वांगीकर यांच्या नेतृत्वाखाली ओबीई रँकिंग्जचे समन्वयक प्रा.दिगंबर काशीद यांच्या सहकार्याने या रँकिंग मध्ये सहभाग नोंदविला होता. या प्रस्तावामध्ये महाविद्यालयात असलेल्या आऊटकम-बेस्ड एज्युकेशन (ओबीई) अंतर्गत विविध उपक्रम, सोयी सुविधा, महाविद्यालयातील ओबीई करिता असणारे व्यवस्थापन आदी बाबींचा समावेश होता. स्वेरीकडून नेहमीच ओबीईला विशेष प्राधान्य दिले जाते. स्वेरीतील सर्व शैक्षणिक उपक्रमांचा परिपाक म्हणजे स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला मिळालेले हे मानांकन होय. यापूर्वी स्वेरी अभियांत्रिकीला देशातील शैक्षणिक क्षेत्रात महत्वपूर्ण असलेले ‘नॅक’ अर्थात ‘नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रिडिटेशन कौन्सिल’चे ४ पैकी ३.४६ सीजीपीए सह ‘ए प्लस’ हे मानांकन मिळाले आहे. ए.आय.सी.टी.ई (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) व यु.जी.सी. (युनिव्हर्सिटी ग्रँटस कमिशन) यांच्याशी संलग्नित असणारे व ४ पैकी ३.४६ सीजीपीए सह नॅकचे ‘ए प्लस’ मानांकन मिळवणारे सोलापूर जिल्ह्यातील पहिले महाविद्यालय ठरले आहे. देशातील शैक्षणिक क्षेत्रातील महत्वपूर्ण असलेला ‘स्वायत्त’ अर्थात  ‘ऑटोनॉमस दर्जा’ ही प्राप्त झाला आहे. हा दर्जा शै. वर्ष २०२४-२०२५ पासून शै. वर्ष २०३३-२०३४ अशा एकूण दहा वर्षांसाठी असणार आहे. महाविद्यालयातील पात्र अभ्यासक्रमांना ‘एनबीए’ चे तीनदा मानांकन मिळाले आहे तसेच शै. वर्ष २०२३-२४ मध्ये  एन.आय.आर. एफ या राष्ट्रीय पातळीवरील रँकिंग मध्ये १५१- ३०० च्या बँड मध्ये स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने स्थान मिळवले आहे. ओबीई रँकिंग्ज २०२४’ मध्ये ‘डायमंड बँड: इन्स्टिट्यूशन ऑफ प्रॉमिनन्स’ हे मानांकन मिळाल्यामुळे स्वेरीमधून  तंत्रशिक्षण पूर्ण करू इच्छिणारे विद्यार्थी आनंदित झाले आहेत. या यशाबद्दल स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख यांच्यासह सर्व विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, स्वेरी अंतर्गत असणाऱ्या सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी स्वेरीच्या ‘आय.क्यू.ए.सी. टीम’ चे अभिनंदन केले आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago