(शेळवे) ता. पंढरपूर येथील कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंजीनियरिंग (डिप्लोमा) मध्ये प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलेशन सेंटर ( एफ.सी.) क्रमांक ६३२६ ची मान्यता मिळाली असून बुधवार दिनांक २९ मे २०२४ पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चिती आधी प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया मंगळवार दिनांक २५ जून २०२४ पर्यंत चालणार आहे. अशी माहिती डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. अजित कणसे सर यांनी दिली.
सन २०२४ – २५ करता डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, भरलेले अर्ज स्वीकारून प्रमाणपत्रे, कागदपत्राची तपासणी छाननी व नोंदणी आधी प्रक्रिया करण्याकरता मुंबई येथील मा. संचालक तंत्रशिक्षण संचालनाय महाराष्ट्र राज्य यांचे अधिकृत केंद्र ( एफ.सी. क्रमांक ६३२६) म्हणून कर्मयोगी डिप्लोमा महाविद्यालयास मान्यता दिली आहे. पंढरपूर पंचक्रोशीतील व ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन, पालकांचा होणारा संभ्रम, संबंधित कागदपत्रे जमवितांना त्यांना होणारी अडचण व शंका याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सुविधा केंद्र सुरू केले असून यंदाचे हे डिप्लोमा इंजिनिअरिंगचे सोळावे वर्ष आहे. कर्मयोगीच्या डिप्लोमा महाविद्यालयाने उज्वल यशाची ही परंपरा कायम राखली आहे. ही प्रक्रिया २९ मे २०२४ पासून दिनांक २५ जून २०२४ सायं. ०५:०० वाजेपर्यंत चालणार आहे. याचा लाभ दहावी मधून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी घेण्याचे आवाहन केले आहे.
या कालावधीत प्रमाणपत्राची पडताळणी, छाननी व नोंदणी आदि प्रक्रियेनंतर मुख्य कॅप राउंडसाठी, ऑप्शन फॉर्म भरण्याची ऑनलाइन प्रक्रिया चालू होणार आहे. डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशा संबंधी अधिक माहितीसाठी प्राध्यापक पंढरपूरकर एस. एस. (९१४६५९७८२०) व प्राध्यापक कोरबू आय. जे. (८८८८४८९२३५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. अजित कणसे सर यांनी केले आहे. पांडुरंग प्रतिष्ठानचे मार्गदर्शक मा. आमदार प्रशांत परिचारक, रोहन परिचारक, कर्मयोगी इंजीनियरिंग चे प्राचार्य डॉ. मा. एस. पी. पाटील, रजिस्टार मा. जी. डी. वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली डिप्लोमा इंजिनिअरिंग फॅसिलेशन सेंटर मध्ये सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून येत आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…