Categories: Uncategorized

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर

उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे.

सदरील घटनेची हकीकत अशी की, सदर घटनेतील फिर्यादी शंतनू भारत धोत्रे हा आहे. दिनांक २४//२०२४रोजी फिर्यादी हे गावातील मारुती मंदिराचे समोर रात्री ८.०० वा चे सुमारास होळीसणाचे निमित्त नैवेद्य दाखविणेस येवून मंदिराचे बाहेर नारळ फोडून थांबला असताना समाधान श्रीपती कसबे, सुदेश निवृत्ती कसबे, आकाश खंडू आयवळे, सतिश निवृत्ती कसबे, राहूल दयानंद साबळे, सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता मंगळवेढा असे येवून समाधान श्रीपती कसबे याने फिर्यादीस “तुझे कसले पैसे मी तुला देणार नाही “म्हणून शिवीगाळ करू लागले असता फिर्यादी समजावून सांगत असतानाच त्या सर्वांनी मिळून त्यास हाताने, लाथाबुक्यांनी मारहाण करून आकाश खंडू आयवळे, सचिन खंडू आयवळे, समाधान श्रीपती कसबे यांनी मारुती मंदिराचे समोर असलेल्या होळीमधून लाकूड आणून त्या लाकडांनी तिघांनी मिळून फिर्यादीचे डोकीत, पाठीवर, डावे पायाचे मांडीवर जोरात मारून जखमी केले. त्यांचे डोक्यातून रक्त येवू लागल्याने महादेव येसू पाटील, राजु आप्पा करे, संजय वसंत रजपूत वगैरे लोकांनी येवून सोडवासोडव केली व फिर्यादीस मारणारे लोक निघून गेले व फिर्यादीचा मामा पिनू लक्ष्मण पाटील, उत्तम केराप्पा बेलदार असे येवून त्यांनी फिर्यादीस उपचारासाठी हॉस्पीटल येथे उपचारास दाखल करून प्राथमिक उपचार घेवून मंगळवेढा पोलीस ठाणे येथे फिर्याद दिलेली आहे.

सदर प्रकारामुळे आरोपी विरूध्द भा.द.वि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ३२६, ३२४, ५०४, ५०६ अन्वये गु. र. नं. २१२/२०२४ चा गुन्हा दिनांक २६/३/२०२४ रोजी रात्री ८.०० वाजता मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे दाखल करणेत आलेला आहे.

सदर प्रकरणात अर्जदार यांचे वतीने अ‍ॅड.संदिप कागदे यांनी युक्तीवाद केला. सदरचा युक्तीवाद ग्राहय धरून अर्जदार यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करणेत आला.सदर प्रकरणात अर्जदार यांचे वतीने अ‍ॅड. संदिप कागदे, अ‍ॅड.महेश कसबे, अ‍ॅड. काकासो केंगार, अ‍ॅड. सपना आरकड यांनी काम पाहिले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 hour ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago