ताज्याघडामोडी

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही

माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या तरुणाला काम मिळावे, आगामी काळात तरुणांना नोकरीसाठी बाहेर जावे लागू नये, म्हणून अनेक कंपन्या सोलापुरात आणून काम देण्याचा मी प्रयत्न करेन. मतदार संघातील परिवारजनांच्या उन्नतीसाठी मी उपलब्ध राहीन. मतदार संघातील भूमिपुत्राला गावातच काम मिळावे यासाठी मी प्रयत्नशील राहीन यासाठी आपणा सर्वांची साथ मला हवी आहे, असे प्रतिपादन भाजपाचे उमेदवार आ. राम सातपुते यांनी केले.

महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील तिर्‍हे येथे गाव भेट दौरा केला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सुभाष देशमुख यांची उपस्थिती होती. ही लोकसभा निवडणूक भाजपा विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी शेतकर्‍यांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. उज्वला योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचा सन्मान केला. हर घर जल मार्ङ्गत घरोघरी नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना असून, मुद्रा योजनेतून ग्रामीण भागातील तरुणांना शेतीपूरक उद्योग व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. देशाच्या विकासासाठी सोलापूरच्या विकासासाठी नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी सर्वांनी भाजपच्या मागे उभे रहावे.

आ. सुभाष देशमुख यांनी यावेळी सांगितले की, 2014 नंतर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ विकासाच्या वाटेवर चालत आहे. या कार्यकाळात प्रत्येक गावात निधी उपलब्ध करून दिला आहे. मतदार संघात नव्याने निर्माण झालेल्या रस्त्यांमुळे भाजीपाला, दूध व्यवसायांना शहर जवळ झाले असून हा शेतीपूरक व्यवसाय आता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नदीकाठच्या लोकांना बंधार्‍यांच्या माध्यमातून जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध होत आहेत. आगामी काळातही दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा असाच विकास व्हावा यासाठी राम सातपुते यांना मताधिक्य देऊन लोकसभेत पाठवावे.

यावेळी उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष राम जाधव, दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ गायकवाड, निवडणूक प्रमुख हणमंत कुलकर्णी, जिल्हा सचिव यतीन शहा, सरचिटणीस संग्राम पाटील, धनाजी घोडके, चिमन साठे,सर्जेराव पाटील, विशाल जाधव, समाधान गायकवाड, प्रताप मल्लाव, शशिकांत पवार, महेश पवार, गणेश पवार, संजय शिंदे , रावसाहेब गायकवाड, गोपाळ सुरवसे, महिला अध्यक्षा -रुशालीताई पवार, उपाध्यक्ष स्वाती पवार, उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 hour ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago